sindhudurga news: स्कूटी चालवणे खरं तर सोपे आहे. यामध्ये बाईक आणि स्कूटर प्रमाणे गियर बदलण्याचा त्रास नसतो. फक्त अ‍ॅक्सिलेटर फिरवा आणि स्कूटी चालू लागते. पण जेव्हा स्कूटीच्या समोरील भागात लहान मुलं उभं असेल तेव्हा स्कूटीचं इंजिन बंद आहे किंवा ते तुमच्या नियंत्रणात आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे. कारण जर तुम्ही यावर लक्ष नाही दिले तर अपघात हा होणारच. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ याचा पुरावा आहे. चालू असलेल्या स्कूटीवर एक माणूस बसला होता. यादरम्यान छोटा मुलगाही स्कूटीचे हँडल धरून समोर उभा होता. हा माणूस काही कामामध्ये व्यस्त असतो तितक्यात या हा मुलगा स्कूटीचा अ‍ॅक्सिलेटर फिरवतो आणि एक गंभीर अपघात होतो. मुलांसोबत स्कूटीवर प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ एक धडा आहे.

मुलाने स्कूटीचा अ‍ॅक्सिलेटर फिरवला

हा व्हिडीओ अवघ्या ४४ सेकंदांची असून यात एक माणूस चालू असलेल्या पांढऱ्या स्कूटीवर बसलेला दिसत आहे. त्याच्यासोबत स्कूटीच्या पुढच्या भागात एक लहान मुलगा देखील उभा आहे. तितक्यात घरातून एक महिला बाहेर येते आणि त्या माणसाला काहीतरी देते. यावेळीच हा चिमुरडा स्कूटीचा एक्सलेटर फिरवतो आणि स्कुटीचे नियंत्रण सुटल्याने स्कुटी थेट पुढे जात खाली पडते. यासोबतच स्कुटीवरील माणूस आणि मुलगा देखील खाली पडतात. त्यानंतर त्या दोघांना बाजूबाजूचे लोक येऊन उचलतात. हा भीषण अपघात पाहून तुमचाही अंगावर काटा येईल.

( हे ही वाचा: २ रिक्षाचालकांचा रस्त्यावरील ‘तो’ डान्स होतोय Viral; नागालँडचे मंत्री Video शेअर करत म्हणाले, ‘लोकांनी…’)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा थरारक अपघाताचा व्हिडिओ

हा व्हिडिओ ट्विटर हँडल @imvivekgupta ने यांनी पोस्ट केला असून हा प्रचंड व्हायरल होत आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, जेव्हा मूल स्कूटीवर असेल, तेव्हा स्कूटी थांबवल्यानंतर इंजिन बंद केले पाहिजे. अन्यथा ही घटना तुमच्यासोबतही घडू शकते. सदर व्यक्तीने ही घटना महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.