सध्या ऑनलाइनचे जग असल्याने प्रत्येक गोष्ट ऑनलाइन खरेदी केली जाते, बुक केली जाते. त्यात आता हॉटेल रूमदेखील प्रवासाआधी ऑनलाइन बुक करण्याची सोय आहे. जर तुम्हीदेखील कामानिमित्त किंवा कुठे प्रवासानिमित्त हॉटेलमध्ये ऑनलाइन रूम बुक करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अलीकडेच बंगळुरूमधून एक प्रकरण समोर आले आहे. त्यात एका गृहस्थाने ओयो अॅपद्वारे हॉटेलमधील रूम ऑनलाइन बुक केली; पण प्रत्यक्षात जेव्हा तो त्या हॉटेलवर पोहोचला तेव्हा तोही शॉक झाला. कारण- बुक केलेले हॉटेल प्रत्यक्षात पूर्णपणे रिकामी होते आणि तिथे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे त्या व्यक्तीला फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला.

@TheChanceSeeker या एक्स अकाउंटवरून अमित चामसीकर नावाच्या व्यक्तीने सांगितले की, त्याने बेंगळुरूमध्ये दोन दिवसांसाठी हॉटेलची रूम ऑनलाइन बुक केली होती. त्यासाठी त्याने अंदाजे तीन हजार रुपये भरले होते. मात्र, हॉटेलच्या पत्त्यावर पोहोचल्यावर दिसले की, तिथे दुरुस्तीचे काम सुरू होते आणि त्या ठिकाणी कोणीही नव्हते. त्याने आपले ट्वीट मेक माय ट्रिप आणि ओयो रूमला टॅग करीत लिहिले की, बेंगळुरूमध्ये घोटाळ्याचा इशारा. नुकतेच इथे आलो आणि कळले की, मी रूम बुक केलेल्या हॉटेलमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. इथे एकही माणूस नव्हता. ही बाब फसवणूक करण्यासारखी आहे. येथे दोन तास वाया घालवल्यानंतर त्यांनी माझ्या रिफंडमधून पैसे कापले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.

अमितने चार फोटोही शेअर केले; ज्यात हॉटेल बुकिंग बिल आणि हॉटेलची चावी होती. त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने अपडेटमध्ये लिहिले- मला ३,१४१ रुपयांचा परतावा मिळाला आहे; जो बुकिंग राशीपेक्षा कमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटिझन्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया

त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे; ज्यावर लोक आपले अनुभव शेअर करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, मला आठवते, एकदा ‘मेक माय ट्रिप’मुळे मला कडक उन्हात राहावे लागले होते. मी 4.7 स्टार रेटिंग असलेल्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. पण तिथे पोचलो, तर एका कोपऱ्यात जंकयार्ड असलेले मोठे रिकामे मैदान होते आणि तिथे हॉटेल म्हणता येईल अशी एकही इमारत नव्हती.

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ओयोमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. एकदा मी हॉटेल बुक केले आणि जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितले की, हॉटेल महिनाभरापासून बंद आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, एकदा मलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता, फरक एवढाच होता की, मी रात्री १.०० वाजता माझ्या कुटुंबासोबत पोहोचलो होतो आणि Oyo मला अटेंड करण्यासाठी किंवा मला रूममध्ये घेऊन जाण्यासाठी हॉटेलमध्ये कोणीही नव्हते. रिसेप्शन काउंटरवरही कोणीच नव्हते. पूर्ण शांतता. त्या दिवशी मी शपथ घेतली की, आजपासून मी कधीही OYO हॉटेलची रूम बुक करणार नाही.