Crocodile Attack Video: मगर ही सर्वात खतरनाक आहे हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मगरीच्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. आपण अनेकदा सिनेमांमध्ये मगरीला पाहतो, प्रत्यक्षात मगर दिसावी असंही कोणाला वाटत नाही, कारण जर तिने शिकार केली तर त्यातून वाचण्याची शक्यता फारच कमी असते. म्हणून जरी मगर दिसली तरी पळता भुई थोडी होते. एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीमध्ये असते. त्यामुळेच काही जण मगरीला बोन ब्रेक मशीन, असेसुद्धा म्हणतात. आणि ही खतरनाक मगर जर का पाण्यात असेल, तर मग काय विचारायलाच नको.
सोशल मीडियावर मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहिले असतील, पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
मगरीने केली कुत्र्याची शिकार (Crocodile Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल. या व्हिडीओमध्ये एक धक्कादायक दृश्य दिसतंय. एका नदी किनारी दोन कुत्र्यांची पिल्ले उभी आहेत. ती दोघं या धक्कादायक घटनेचे साक्षीदार आहेत. व्हिडीओमध्ये दिसून येतंय की एका भल्यामोठ्या मगरीच्या तोंडात कुत्र्याचं लहानसं पिल्लू आहे. ते मगरीच्या तोंडातून बाहेर येण्यासाठी जीवाचं रान करताना दिसतंय. पण काही केल्या ते पिल्लू बाहेर येऊ शकत नाही. बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यासाठी तळमळणाऱ्या त्या कुत्र्याच्या पिल्लाला मगर गिळून टाकते आणि क्षणातच ते कुत्र्याचं पिल्लू मगरीची शिकार होऊन जातं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mr__editor_02_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.८ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Crocodile Viral Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मला त्या कुत्र्यासाठी खूप वाईट वाटलं”, तर दुसऱ्याने “ज्याने व्हिडीओ काढलाय त्याच्यावर पण विश्वास ठेवू नका एआयने व्हिडीओ बनवला आहे” अशी कमेंट केली.