Viral video: आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात.एका क्षणात या सगळ्या गोष्टी होतात. सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत.

तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये अशी घटना घडली आहे. या व्हिडीओवरुन कधी काय होईल याचा नेम नाही हे लक्षात येत आहे.

या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

दिल्लीतील करोल बाग परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एअर कंडिशनर थेट डोक्यावर पडल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. संध्याकाळी ७ वाजता घडली जेव्हा जितेश चढ्ढा असे ओळख पटवण्यात आलेला हा किशोरवयीन मुलगा एका स्कूटरवर बसून त्याच्या मित्रासोबत बोलत होता. ते बोलत असताना, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून अचानक एक एअर कंडिशनर युनिट कोसळले, ज्यामुळे स्कूटरवरील मुलाच्या डोक्यावर थेट आदळला आणि नंतर तो जमिनीवर कोसळला. याचा वेग इतका प्रचंड होता की या तरुणाचा मृत्यू झालाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरुणाचा मित्र मात्र यातून थोडक्यात बचावला आहे. तो जर २ सेकंदाआधी मागे झाला नसता तर त्याच्या डोक्याच हा एसीचा बॉक्स पडला असता.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DIaNHbrsRsR/?utm_source=ig_web_copy_link

दोन्ही मुलांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी १८ वर्षीय तरुणाला मृत घोषित केले. त्याचा १७ वर्षीय मित्र जखमींवर उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.डीबीजी रोड येथील स्थानिक पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल केला आहे आणि एसीच्या अपघाताचे कारण तपासण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.