Virar local viral video: मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही विरार लोकलनं प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण विरार ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही. अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. मुंबई लोकलनं प्रवास करणं काही सोपं काम नाही. दर मिनिटाला हजारो प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे अर्थातच या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की किंवा भांडणं वगैरे होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण काही वेळेस या भांडणांचं रूपांतर जीवघेण्या हाणामारीत होतं.याच पार्श्वभूमीवर विरार लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डब्यामध्ये गर्दी आहे. त्यामुळे अर्थातच हे भांडण धक्काबुक्कीवरून झालं असणार. पण पाहता पाहता हे भांडण इतकं वाढलं की दोघंही एकमेकांच्या जीवावर उठले. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तु्हीच सांगा यात नेमकी चूक कुणाची ?

आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक विरार लोकलमधील दोन पुरुषांच्या गटात राड्याचा भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विरार लोकल वेगात धावत आहे आणि यावेळी लोकलच्या दरवाजात उभ्या दोन गटांमध्ये बाचाबाची सुरु होते. याचं नंतर हाणामारीमध्ये रुपांतर होऊन त्यातला एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाची मान धरत अक्षरश: लोकलच्या बाहेर ढकलत आहे. यावेळी एक चूक त्याच्या जीवावर बेतू शकते अशी परिस्थिती दिसत आहे. या दोघांना अनेक जण ओरडून शांत राहण्यास सांगत आहेत मात्र दोन्ही प्रवासी एकमेकांवर तुटून पडले आहेत. यामुळे विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार असा सवाल सगळे करत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ hp_live_news नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.  यावर आता नेटकरीही संतापले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हंटलंय “दादा क्षणभराचा राग आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल” तर आणखी एकानं म्हंटलंय की “विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार काय माहिती? “