Viral video: सध्या लग्नांचा हंगाम सुरू असून, सोशल मीडियावर लग्नांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात डान्स, गाणी, प्रथा, तसेच नवरदेव-नवरीचे खास क्षण चर्चेत असतात. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि लक्षात राहणारे क्षण असले तरी काही वेळा एका चुकीमुळे संपूर्ण वातावरण बिघडू शकते. लग्नात फटाके फोडणे एक आजकाल फार सामान्य आहे मात्र कधीही फटाके फोडताना विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते अन्यथा नको ते अपघात घडू शकतात. असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडून आल्याचे समोर आले ज्यात फटाक्यांमुळे नवरा गंभीर जखमी झाला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. लहानपणापासूनच प्रत्येकजण आपल्या लग्नाचा दिवस कसा असावा यापासून ते अशा असंख्य गोष्टींचे स्वप्न रंगवत असते. मात्र, कधी कधी नियोजन कितीही चोख असले तरी नियती काही वेगळेच ठरवते आणि आनंदाचे खास क्षण अनपेक्षित घटनांमुळे कटू अनुभवांमध्ये बदलते.
सध्या असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नात फोटोशूटसाठी एका आकर्षक गोष्टीची निवड केली. मात्र, त्या गोष्टीने नवरदेवाला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आणली. ज्यात त्यांनी फोटो खास येण्यासाठी रंगीबेरंगी धूर बॉम्ब आणि फटाके वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र फोटोशूट करत असताना अचानक रंगीबेरंगी धूर बॉम्ब जोरदार फुटला आणि थेट नवरदेवाच्या डोक्यात येऊन फुटला, यामध्ये नवरदेव गंभीर जखम झाला. सर्व धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर rajeshgarwal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लग्नातील घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूजर्संनी लिहिले आहे,”सध्या या घटना वाढत आहेत” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”पारंपारिक लग्न केलेले बरे” तर तिसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,”सध्याच्या तरुणाईला थाटा-माटात लग्न करण्याची सवय लागली आहे” तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.