Shocking Video of Boy: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. लहान मुलांना नवनवीन गोष्टी शिकण्याची, तसंच काहीतरी वेगळंच करून पाहण्याची खूप उत्सुकता असते. मग आजूबाजूला पालक अडवायला नसले तर ते मनाला येईल ते करतात. यात आपल्याला दुखापतदेखील होऊ शकते, याचा विचार न करता अगदी धोकादायक स्टंटच करतात असं म्हणायला हरकत नाही.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा जीवघेणा स्टंट करताना दिसतोय. नेमकं काय करतोय हा मुलगा जाणून घेऊ…
मुलाचा व्हिडीओ व्हायरल (Boy Opening Lift Door Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याने चांगलाच प्रताप केलेला दिसतोय. व्हिडीओत आपण पाहू शकतो की एक लहान मुलगा लिफ्टमध्ये जातो आणि बटण दाबतो. लिफ्ट सुरू झाल्यावर तो चालत्या लिफ्टचा चक्क दरवाजाच उघडतो. लिफ्ट सुरू असताना जोर जोरात ताकद लावून तो चिमुकला लिफ्टचा दरवाजा उघडताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. लिफ्टचा दरवाजा उघडताच ती लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये थांबते आणि हे पाहून तो मुलगा लगेच दरवाजा बंद करतो. यानंतर तो लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहू लागतो.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sattepesatta.official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तर या व्हायरल व्हिडीओला “लहान मुलाने चक्क चालत्या लिफ्टचा दरवाजा उघडला. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नशीब त्याचा हात लिफ्टच्या दरवाजात सापडला नाही” तर दुसऱ्याने “मुलगा इंजिनियर आहे वाटतं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “लिफ्ट बंद पडली असेल म्हणून तो लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करत असेल” तर एकाने, “आई वडिलांचं लक्ष कुठे असतं, पालकांनी अधिक काळजी घ्यायला हवी” अशी कमेंट केली