Bride Video Viral: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही औरच असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या कायम लक्षात राहतात.
हल्ली लग्नात जबरदस्त एन्ट्री व्हावी म्हणून अनेक जण काही ना काही हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. पण अशात अनेकदा आपल्याकडूनच काही चूक घडते आणि अनर्थ घडतो. सध्या असाच काहीसा प्रकार एका लग्नसोहळ्यात घडलाय. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या..
नवरीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Bride Video)
लग्नसोहळ्यात स्टेजवर आपला खास क्षण साजरा करत असताना नवऱ्याकडून अशी चूक होते जी नववधूला महागात पडले. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नववधू आणि नवरदेव आपला लग्नसोहळा आनंदात साजरा करताना दिसतात. तेवढ्यात नवरदेव हातात एक स्पार्क फायर कॅंडल घेतो. कॅंडलने पेट घेताच त्याचा एक जळता तुकडा नवरीच्या तोंडावरच उडतो. चेहऱ्याला चटका लागताच नवरी लगेच बाजूला होते. नवरदेव तिच्याजवळ जातो आणि तिला धीर देतो. या लहानशा गोष्टीमुळे मोठा अपघात होता होता टळतो. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @sarcasm_only या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ७.९ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
नववधूचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो ज्या पद्धतीने तिची काळजी घेतोय, खूपच गोड” तर दुसऱ्याने “ती एक चूक होती आणि त्याने लगेच तिची काळजी घेऊन ती परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला “नशीबाने तिला जास्त काही झालं नाही किंवा तिने वापरलेला हेअरस्प्रे पेटला नाही”. तर एकाने “यात कोणालाही दोष देणे योग्य नाही. ही एक अनपेक्षित परिस्थिती होती.” अशी कमेंट केली.