Bride Spits on Groom Video: लग्न प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न समारंभ अगदी आनंदात साजरा केला जातो. लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं.
आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात. पण अनेकदा लग्नात अशा काही गोष्टी घडतात, ज्या खूप धक्कादायक असतात.
अनेकदा काही लग्न जबरदस्तीने लावली जातात. पण मग अशावेळी या नात्यात कोणीच खुश राहू शकत नाही. अशा काही कारणांमुळे काहीजण लग्नातूनच पळून जातात. पण सध्या एका नवरीने भर लग्नात असं काही केलं की, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.
व्हायरल व्हिडीओ (Shocking Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, भर लग्नात नवरीने नवऱ्याचा अपमान केला आहे. मंडपात आपण पाहू शकतो, नवरदेव लग्नादरम्यान नवरीचा हात मागण्यासाठी त्याचा हात पुढे करतो. तर नवरी थेट नवऱ्याच्या हातावरच थुंकते. यामुळे लग्न रद्द झालं असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @tv1indialive या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “वराने वधूसमोर हात पुढे केला पण ती त्यावर थुंकली, यामुळे लग्न रद्द झालं” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २६.५ मिलियन व्हयुज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अभिनंदन भाऊ, तुमचं आयुष्य बरबाद होता होता वाचलं” तर दुसऱ्याने “हात खराब झाला पण आयुष्य वाचलं” अशी कमेंट केली. तर एकाने “नक्कीच जबरदस्तीने लग्न लावलं असेल पण वरासाठी हे खूप दुःखद आहे” अशी कमेंट केली. “ज्या नात्यात आदरच नसेल ते नात नसलेलंच बरं” असं एकजण कमेंट करत म्हणाला.