गेल्या अनेक वर्षांपासून आजारांचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय. अगदी लहानग्यांपासून- मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गंभीर आजार होतात. यात कधी कुठे काय होईल याचादेखील नेम नसतो. ठणठणीत असलेल्या माणसालादेखील अचानक गंभीर आजार जडतो आणि यात लोकं आपला जीवही गमावतात. अशातच हृदयविकाराचा झटका येणंही आता अगदी सामान्य झालंय. घरात असताना, प्रवास करताना, गाडी चालवतानादेखील अचानक याचा त्रास होतो आणि माणूस जागच्या जागी आपले प्राण सोडतो.

सध्या अशीच एक घटना तमिळनाडू येथे घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जिथे हृदयविकाराचा झटका येताच आपले प्राण सोडण्यापूर्वी चालकाने माणुसकी दाखवली आणि चिमुकल्यांचे प्राण वाचवले. नेमकं काय घडलं जाणून घेऊ…

हेही वाचा… असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! कार भरवेगात आली अन् खांबावर आपटली, काच फुटून माणूस पडला बाहेर, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओ पाहून माणुसकीला कराल सलाम

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस बसमध्ये ड्रायव्हर सीटवर निपचित पडला आहे. याच्याच बाजूला स्कूल बसचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला की नेमकं काय घडलं. या व्हिडीओमध्ये कॅप्शनद्वारे संपूर्ण घटना सोशल मीडिया युजर्सबरोबर शेअर केली आहे.

हा व्हिडीओ @itsgyanstation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अशा शूर ड्रायव्हरला मनापासून सलाम. तमिळनाडूमधील एका शाळेतील बसचालकाला रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आला. तब्येत बिघडताच चालकाने आधी सुरक्षित ठिकाणी बस लावली आणि मरणाच्या आधी २० मुलांचा जीव वाचवला.” व्हायरल झालेल्या या व्हिडीओला तब्बल २.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… बापरे! चालत्या गाडीतून शाळकरी मुलं रस्त्यावर पडली, चिमुकला टायरखाली अडकला अन्…, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ड्रायव्हरला मनापासून सलाम, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.” तर दुसऱ्याने “खरा हिरो” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत विचारलं, “ड्रायव्हर सुरक्षित आहे का?”

हेही वाचा… मध्यरात्री कामावरून आलेल्या तरुणीचा ‘त्याने’ पाठलाग केला; तरुणीच्या एका निर्णयामुळे डाव पलटला; VIDEO पाहून घाम फुटेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशा घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्याची तमिळनाडूची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.