Dowry in Wedding Video: लग्न केवळ दोन व्यक्तींनाच नाही तर दोन कुटुंबाना एकत्र आणतं. लग्न करून सासरी जाणं हे कोणत्याही मुलीला थोडं जडच जातं. त्यात अजूनही हुंडा नावाची प्रथा कुठे ना कुठे सुरूच आहे. अनेकदा हुंड्यासाठी काही मुलींना सासरची मंडळींकडून जाच सहन करावा लागतो. सध्या असाच काहीसा प्रकार भरलग्नात घडला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हुंड्यासाठी भरलग्नात नवरदेवाने काय केलं पाहा…
वराचा व्हिडीओ व्हायरल (Groom asking for Dowry in Wedding Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आप पाहू शकतो, की एका ठिकाणी एका जोडप्याच्या नव्या आयुष्याला सुरूवात होत आहे. भव्य असा लग्नसोहळा पार पडत आहे. पण या सोहळ्यात नवऱ्याने हद्दच पार केली. हुंड्यात येणाऱ्या कारची डिलिव्हरी उशिरा झाली म्हणून नवऱ्याला राग आला आणि त्याने मंडपातच गोंधळ घालायला सुरू केला. मंडपातल्या वस्तू इकडे तिकडे फेकायला सुरूवात केली. नवरीबरोबरच लग्नातल्या अनेक पाहुण्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही थांबला नाही. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली, हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @the_bharatmitra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “हुंड्यात गाडीची डिलिव्हरी उशिरा झाली म्हणून नवऱ्याला आला राग, मंडपातच तमाशा करू लागला वर” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याचे वडील आजपर्यंत गाडी खरेदी करू शकले नाहीत. आणि याला हुंड्यात गाडी हवी आहे. जो हुंडा मागतो तो आयुष्यभर तेच करतो.” तर दुसऱ्याने “अशा व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा त्या मुलीने अविवाहित राहणे चांगले.” अशी कमेंट केली.