कोणाच्याही घरात लहान मुलं असली की कायम त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. कारण कधी कोणता वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. बाहेर असताना लहान मुलांची विशेष काळजी घेतली जाते, त्यांना लागू नये, ते मस्ती करता करता कुठे पडू नये यासाठी त्यांच्यामागे एक माणूस असतोच. अशा वेळेस अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांना दुखापत होते.

कुठेही अशा चिमुकल्यांना एकटं सोडणं म्हणजे एक धाकधूकच असते. अनेकदा लहान मुलंही पालकांचं न ऐकता अशा गोष्टी करतात, ज्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावतं. आणि मग यामुळेच भयंकर अपघातासारख्या गोष्टी घडतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात, पालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि चिमुकलीच्या एका चुकीमुळे तिचा जीव धोक्यात गेला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

एक चूक अन् चिमुकलीचा जीव धोक्यात

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक चिमुकली धावत धावत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका स्कूटरवर बसते. स्कूटरवर बसून ती मुलगी स्कूटर चालू करण्यासाठी एक्सीलेटर फिरवते. स्कूटर आधीच सुरू असल्याने ती वेगात पुढे जाते. आणि पुढे जाताच स्कूटरसह ती चिमुकली खाली कोसळते. खाली पडताच एक माणूस तिच्या मदतीला धावून येतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @widiyantiibura या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “मुलं आजूबाजूला असताना गाडी चालू ठेवू नका” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे झाली हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बापरे, तिला जास्त दुखापत तर झाली नाही ना…” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “म्हणून आपली मुलं आजूबाजूला असताना काळजी घ्यावी” तर तिसऱ्याने “गाडी सुरू ठेवण्याची गरजच काय…” अशी कमेंट केली.