Shocking Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अनेकप्रकारचे स्टंट काही लोक करत असतात. यात तरुणाईची संख्या जरा जास्तच असते. सोशल मीडियाच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी काहीही करायला तयार होतात आणि यात आपला जीव धोक्यात घालतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका तरुणाने केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तरुणाने स्वत:च्याच पॅंटला आग लावली (Viral Video)

सध्या सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण रस्त्यावरून गाण गात चालताना दिसतोय. पण हे सगळं करताना त्याच्या पॅंटला आगदेखील लागली आहे. तीच पेटलेली पॅंट घालून हा तरुण असा जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. आग वाढत जात असतानाही तो गाण गात असल्याचं दिसून येतोय. पण ज्या क्षणी आग आटोक्याबाहेर जाते आणि त्याला चटका लागतो तो आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर बसून आपली पॅंट काढतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “निषेधासाठी उदयोन्मुख गायकाने स्वतःच्या पँटला लावली आग पण…अपुऱ्या मानधनाच्या निषेधार्थ एक उदयोन्मुख गायकाने चक्क स्वतःच्या पँटला आग लावून लक्ष वेधण्याचा धाडसी प्रयत्न केला. ही प्रतिकात्मक कृती व्हिज्युअल इफेक्ट्स कामासाठी मिळालेल्या अपूर्ण पेमेंटच्या विरोधात करण्यात आली होती.” असं लिहिण्यात आलं आहे.

“मात्र हा स्टंट काही क्षणांतच संकटात रूपांतरित झाला, आणि आजूबाजूच्या लोकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, कलात्मक अभिव्यक्ती, कार्यस्थळ नीतिमत्ता आणि सुरक्षितता यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.” असंही कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

“स्थानिक प्रशासन या प्रकाराची चौकशी करत आहे, तर संबंधित गायकाचा दावा आहे की, उद्योगात निर्माते कलाकारांना कसे जाळतात, हे दाखवण्यासाठीच ही कृती केली होती.” अशी माहिती इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @policenamaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३५ लाखांपेक्षा व्हयुज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बरोबरच झालं त्याच्याबरोबर, असंच पाहिजे” तर दुसऱ्याने “हे सगळं रीलचं वेड आहे, प्रसिद्धीसाठी लोक कोणत्याही थराला जातात” अशी कमेंट केली.