Shocking Video: आई आणि तिच्या लेकीचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकीला जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. त्या लेकीचं लग्न झालं की, स्वत:पासून लेकीला दूर करण्याचं दुखही आईला खूप असतं. अगदी लेकीसारखंच जावयालाही ती मुलासारखं मानते. अशात जावई लाखात एक मिळाला तर त्यांचं नातंही अगदी आई मुलाप्रमाणे असतं.
आपण अनेकदा सासू जावयाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहत असतो. पण सध्या या नात्याला काळीमा फासणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत सासू चक्क जावयाबरोबरच पळून गेली. नेमकं काय घडलं जाणून घ्या…
सासूचा व्हिडीओ व्हायरल (Sasu and Jawai Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक महिला पोलिसांच्या गाडीतून खाली उतरते आणि पोलीस तिला दवाखान्यात घेऊन जातात. व्हिडीओच्या कॅप्शननुसार असं म्हटलं जातंय की, ही महिला तिच्या जावयाबरोबर पळून गेली आणि गरोदर राहिली. पोलीस महिलेला दवाखान्यात याच तपासणीसाठी घेऊन गेल्याचं या व्हिडीओमध्ये म्हटलं जातंय. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @rider.noni या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “जावयासोबत पळून गेलेली सासू झाली प्रेग्नेंट; पोलीस दवाखान्यात तपासणीला घेऊन गेले” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जावई जोमात सासू कोमात” तर दुसऱ्याने “लाखात एक नव्हे तर करोडोत एक जावई” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “घोर कलयुग, आता अजून काय काय बघायला लागणार आहे काय माहित” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अशा आईपेक्षा नसलेली बरी”