TTE Viral Video: गेल्या काही दिवसांपासून प्रवासी तिकीट न घेता प्रवास करतात आणि नंतर TTE सोबत भांडणं करतात अशा प्रकारची प्रकरणे वाढत चालली आहेत. अलीकडेच, TTE ने रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे, ज्यात एक महिला तिकीट न घेता प्रवास करत असल्याचं दिसत आहे, या घटनेत महिलेने TTE ला बोलून त्रास दिला आणि तिकीट मागितल्यावर त्याच्यावर चहा फेकला.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दोन महिला आणि TTE यांच्यात तणावपूर्ण वाद दाखवला आहे. त्या वादात, एक महिला अधिकाऱ्याशी भांडताना दिसते, आणि TTE च्या म्हणण्यानुसार तिने केवळ आरडा ओरडाच केला नाही, तर भांडणादरम्यान त्याच्यावर गरम चहा देखील फेकला.
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की TTE इतर प्रवाशांना विचारतो, “या मुलीने मला शिव्या दिल्या, तुम्ही ऐकलं की नाही ऐकलं” व्हिडिओत प्रवासी TTE च्या गोष्टीशी सहमत असल्याचे दिसतात. तर दुसऱ्याबाजूला महिला असं म्हणताना दिसतेय की, “तुम्ही मला मारलं.”
TTE पुढे म्हणतो, “या मुलीने माझ्यावर गरम चहा फेकला.” प्रवासी पुन्हा TTE च्या गोष्टीशी सहमत होतात. तर महिला चहा फेकल्याच्या आरोपाचा नाकारताना ऐकू येते.
अहवालानुसार, या दोन महिला सामान्य तिकिट घेऊन स्लीपर कोचमध्ये प्रवास करत होत्या, जे नियमांविरुद्ध आहे. वादानंतर, महिलेला बाराबंकी स्थानकावरून ट्रेनमधून उतरवण्यात आले, पण त्या जबरदस्तीने परत त्याच कोचमध्ये चढल्या. नंतर त्या चारबाग स्थानकावर पोहोचल्यावर त्यांना पुन्हा उतरवण्यात आलं. अहवालानुसार, चारबाग GRP मध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून लवकरच FIR दाखल केली जाईल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @khurpenchh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “देहरादून एक्सप्रेसमध्ये तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या एका महिलेने टीटीईला शिवीगाळ केली आणि त्याच्या तोंडावर चहा फेकला. महिला सक्षमीकरण अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडरसाठी तुम्ही नाव देऊ शकता का?” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओला तब्बल ५३.८ k व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “जर एखाद्या पुरूषाने हेच कृत्य केले असते, तर आतापर्यंत ९०% सोशल मीडियाने त्या पुरूषावर विविध प्रकारच्या शिव्यांचा वर्षाव केला असता. त्या महिलेनेही वकील नेमला असता आणि त्याच्यावर विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला असता.” तर दुसऱ्यानं “चहा फेकायला नको हवी होती. जर तिकीट नसते तर टीटीईला १०० किंवा ५० रुपये द्यायला हवे होते आणि तो टीटी निघून गेला असता.” अशी कमेंट केली.