Shocking Video: कल्याण (पूर्व) येथील कोळसेवाडी भागात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणीने आपल्या मालकाला सार्वजनिक ठिकाणी चोप दिला. यामागचं कारण म्हणजे, तो मालक तिला काम करताना अश्लील मेसेज पाठवत होता. हा प्रकार मोबाईलवर रेकॉर्ड झाला असून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
तरुणी एका दुकानात काम करत होती. दुकानमालक तिला सतत अश्लील आणि चुकीचे मेसेज पाठवत होता. हे त्रास सहन न झाल्याने तरुणीने थेट मालकाला दुकानातच चपलेने मारहाण केली.
व्हायरल व्हिडीओ (Shocking Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तरुणी रडत-रडत आणि त्रस्त होऊन दुकानमालकाला चपलेने वारंवार मारताना दिसते आहे. तिच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलेले तिचे आई-बाबा दुकानदाराला अद्दल घडवण्यासाठी मुलीला तू मार मार असं म्हणताना दिसत आहे. ही घटना अनेक लोकांसमोर घडली. तेथील काहींनी मोबाईलवर हा प्रकार रेकॉर्ड केला.
दुकानदाराला चांगलीच अद्दल घडवल्यानंतर तिची आई त्याला मुलीचे पाय धरून माफी मागायला सांगते हेदेखील या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. दुकानदार आपल्या चुकीची माफी त्या मुलीच्या पाय पकडून मागताना दिसतोय.
प्रसंग वाढताच दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली. काही लोक आणि त्या मुलीचे नातेवाईक लगेच न्यायाची मागणी करू लागले. त्यांनी दुकानमालकाला जबरदस्तीने मुलीच्या पायाशी पडून सगळ्यांसमोर माफी मागायला लावली.
मुंबई पोलिसांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहून लगेच प्रतिसाद दिला. त्यांच्या अधिकृत X हँडलवरून त्यांनी लिहिले, “आम्ही तुमच्याशी संपर्क केला आहे. कृपया तुमचा मोबाईल नंबर DM मध्ये पाठवा.” म्हणजेच पोलिस तो व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीशी थेट बोलू इच्छित आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @nextminutenews7 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “महाराष्ट्रातील कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणीने दुकानदाराच्या दुकानात काम करत असताना तिचा विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर ती तिच्या चप्पलांनी त्याच्यावर हल्ला करत असल्याचे दिसून आले आहे.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला १,५४६ व्ह्यूज आले आहेत.