Shocking Video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ फार गंभीर असतात. गेल्या अनेक वर्षांपासून दारूची तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री अशा अनेक प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. नेमकं व्हिडीओमध्ये काय घडलंय, जाणून घेऊया…

व्हायरल व्हिडीओ (Shocking Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला पोलिसांसमोर आपले कपडे फाडताना दिसतेय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

ही घटना मोहालीच्या लखनौर गावात घडली. गुप्त माहितीवरून एक्साईज टीम आली तेव्हा गुडी नावाच्या महिलेवर बेकायदेशीर दारू विक्रीचा आरोप झाला. तिच्याकडे चंदीगडहून आणलेली दारूची पिशवी सापडली. पकडूनही ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी महिला पोलीस बोलावून तिची अटक करण्यात आली. तिच्यावर बेकायदेशीर दारू बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला आणि दारू जप्त करण्यात आली.

व्हिडीओसाठी खाली क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @brut.india या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच व्हिडीओला ‘पोलिसांच्या छाप्यात बेकायदेशीर दारू विकणाऱ्या एका महिलेला पकडण्यात आले.’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ३.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “माहित नाही का वाईट वाटतंय” तर दुसऱ्यानं “तिला असं दाखवून काय साध्य होईल असं वाटलं होतं?” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “बिचारी बाई, देवालाच माहीत, ती असं का करत आहे, कदाचित तिच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी. आणि भारतातील मोठे माफिया आणि राजकारणी मोठे गुन्हे करून सुटतात!”