Shocking video: पोलीसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी सोपविलेली असते. तसेच आवश्यक प्रसंगी आपल्या सुरक्षिततेचीही जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र सर्वसामान्य लोकांना वेगळे नियम आणि पोलिसांसाठी काही वेगळे नियम आहेत का, असा संतप्त सवाल लोक करीत आहेत. जे वर्दी परिधान करून कायद्याचं रक्षण करण्याची शपथ घेतात तेच जर बिनधास्तपणे लोकांशी चुकीचे वागले तर जनतेला काय संदेश जातो?. एकीकडे पोलिसांकडे अतिशय आदराने पाहिले जाते मात्र मुंबईतील एका घटनेमुळे पोलीस जनतेचे मित्र आहेत की शत्रू असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारण पोलीस ठाण्यात एका महिला अधिकाऱ्याने सर्वसामान्यांना शिवागीळ केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ पाहिल्यानंतर महिला अधिकाऱ्याचं वागणं पाहून तुमचाही संताप होईल.

मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, यावेळी महिला पोलिसाने तक्रार स्वीकारण्यास नकार दिला, तक्रार स्वीकारण्यास नकार देताच तक्रारदार महिलने महिला पोलिसाला जाब विचारला. यावर महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे चांगल्याच आक्रमक झाल्या. यावेळी तक्रारदार महिलेने पोलीस महिलेला नाव विचारले असता तिला वर्दीवरील नेम प्लेट आणि बॅच फेकून मारली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून लोक प्रचंड संतापले आहेत

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे आणि कारवाईची मागणी होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत महिला पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करत आहेत. एकानं म्हंटलंय, “वर्दीचा गैरवापर करतात काही अधिकारी. पण हेसुद्धा खर आहे की, त्यात बरेच अधिकारी आणि कर्मचारी ईमानदार पण आहेत, जे नेहमी चांगल काम पण करतात.” तर दुसऱ्या युजरने, “सदर पोलीस महिला अधिकाऱ्याकडे जबाबदारीचं पद आहे याची जाणीव करुन देण गरजेचं आहे. पोलिस हे सुरक्षेसाठी असतात पण कायम असुरक्षितता भासते. मा.गृहमंत्र्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण गरजेचं आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं, “महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार सर्सास चालु असतोय.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.