Railway accident video: रेल्वे अपघातांच्या बातम्या अनेकदा समोर येतात. कधी रेल्वे अपघात होतो तर कधी रेल्वेने प्रवास करताना एखाद्या व्यक्तीसोबत अपघात होतो. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ आहेत, जे पाहून कोणीही घाबरून जाईल. याबाबत अनेकदा रेल्वेकडून जनजागृती मोहीमही राबवली जाते, मात्र तरीही लोक त्याबाबत गांभीर्य दाखवत नाहीत. काहीवेळा हे अपघात स्वत:च्या चुकीमुळे होतात तर कधी दुसऱ्याच्या. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये टवाळ तरुणांच्या चुकीमुळे एक तरुणी थेट ट्रेनखाली पडली..हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली आहे. यावेळी ट्रेन पकडण्यासाठी सगळ्यांचीच धावपळ चालली आहे. यावेळी ३ ते ४ तरुण ट्रेनमधून खाली उतरताना दिसत आहेत तर याचवेळी काही तरुणी ट्रेन पकडण्याच्या घाईत आहेत. याचवेळी ही टवाळ मुलं त्यांना त्रास देत आहेत. कोणी धक्का देत आहे तर कुणी मुद्दाम त्रास देताना दिसत आहे. याचवेळी एक तरुण तरुणीला धक्का देतो आणि ती थेट ट्रेनखाली पडते.

मुलांच्या मस्तीमुळे एक तरुणी ट्रेनच्या आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये पडलेली आहे.व्हिडिओ पाहून तुमच्या अगांवर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> संतापजनक! पार्किंगचे पैसे मागितले म्हणून कार चालकाचे धक्कादायक कृत्य; १०० मीटरपर्यंत नेले अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेच्या फाटकावर जीव मुठीत धरून लोक अनेकदा प्रवास करताना दिसतात. लोकल ट्रेनमध्ये असे दृश्य सर्रास पाहायला मिळत आहे. केवळ लोकल ट्रेनमध्येच नाही, तर सामान्य पॅसेंजर आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांमध्येही असे प्रकार दिसून आले आहे.