श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये न्यायालयाने आरोपी आफताब पूनावालाला चार दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे. तपास सुरू असल्याने आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. या मागणीला मान्यता देत न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून दिली. तसेच आफताबच्या सत्यशोधन चाचणीला (लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट) परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच दुसरीकडे आफताब आणि श्रद्धाच्या ओळखीतील लोकांकडून रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे. असाच एक अनुभव आता आफबातला २०१४-१५ साली ठाण्यात भेटलेल्या एका व्यक्तीने फेसबुकवर शेअर केला आहे.

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

शुभाशिष दास असं ही पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने आफताबला नोकरी मिळवून देण्यासंदर्भात त्याच्याशी भेट झाल्याचं म्हटलं आहे. तसेच आपल्याला आफताब या भेटीमध्ये योग्य व्यक्ती वाटला नाही त्यामुळेच मी त्याला मदत करण्यास नकार दिला. यावरुन ज्या मैत्रिणीच्या माध्यमातून दास आणि आफताबची भेट झाली होती तिच्याबरोबची मैत्रीही संपुष्टात आल्याचा दावा दास यांनी केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे पाहूयात…

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: त्यावेळी आफताब-श्रद्धानं एकत्र असताना केली होती गांजाची खरेदी; पोलिसांना पुरावेही सापडले

मी आफताब पूनावालाला २०१४-१५ साली ठाण्यात भेटलो होतो. मी त्याला नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करावी असं सांगत माझ्या एका फेसबुकवरील मित्राच्या मध्यस्थीने भेट झाली होती. त्याची भेट झाली तेव्हा त्याने तुझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना मी ओळखतो असं सांगितलं. तसेच आपल्या दोघांना ओळखणारे तीन मित्र असल्याचंही त्याने सांगितलं. तसेच त्याने या सर्व हिंदू मुली आहेत असंही तो म्हणाला.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”

तो ज्या पद्धतीने त्याच्या या ओळखींबद्दल बढाया मारत होता ते पाहून मला अस्वस्थ वाटू लागलं. मी त्याला मदत करण्यास नकार दिली. मी माझ्या त्या फेसबुकवरच्या मैत्रिणीलाही हा मुलगा योग्य नाही, त्याच्या पासून दूर राहा असं सुचवलं. तिने लगेच मला हा मुलगा मराठी किंवा बंगली असता तर तू त्याला मदत करायचं नाकारलं असतं का? असं विचारलं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: चार सिम कार्ड, फ्रिज अन् सोशल मीडिया Accounts; आफताबसंदर्भात नवा धक्कादायक खुलासा

त्यावर मी तिला थेट सांगितलं की मला तो मुलगा योग्य वाटला नाही, मी त्याला मदत करणार नाही. संपला विषय. तिने लगेच मला ब्लॉक केलं. त्यानंतर मी तिच्याशी कधीही बोललो नाही.

आज मी ही बातमी पाहिली की त्याच मुलाने त्याच्या प्रेयसीचे तुकडे केले (त्या मुलीचे म्हणजे माझ्या त्या फेसबुकवरील मैत्रिणीचे नाही) प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते.

याच कारणामुळे लोक तनिष्क, सर्फ एक्सेल सारख्या कंपन्यांच्या जाहिरांना विरोध करतात. या कंपन्या लव्ह जिहादला वेष्टन देण्याचा प्रयत्न करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “नॉन-व्हेज खाण्यासाठी आफताब श्रद्धावर बळजबरी करायचा, तिने नकार दिल्यास…”; नवा खुलासा

हा गुन्हा आपल्याकडून संतापाच्या भरात झाला. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत, असं आफताबने न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितलं.