Viral Video: देशभरात अनेक नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी वाहतुकीच्या विविध पद्धतींचा वापर करतात. ट्रेन, विमान, बस या सेवा तर आहेतच; पण काही नवीन करून पाहण्यासाठी काही जण सायकल, बाईक, स्वतःची कार, व्हॅन तर रिक्षा घेऊनसुद्धा प्रवास करताना दिसतात. पण, तुम्ही कधी कोणाला स्केटबोर्डनं प्रवास करताना पाहिलं आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका तरुणानं मनाली ते कन्याकुमारी, असा प्रवास स्केटबोर्डवरून केला आहे.

रितिक क्रॅटझेल एक प्रोफेशनल स्केटर आहे. एका लहान बॅकपॅकसह तो एका खास प्रवासासाठी निघाला आहे. त्यानं स्केटबोर्डवरून त्याचा प्रवास मनालीपासून सुरू केला आणि तो कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहचला. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानं हा प्रवास १०० दिवसांत पूर्ण केला आहे. त्यानं प्रवासादरम्यान अनेक व्हिडीओ शेअर केले आणि स्वतःचा अनुभवसुद्धा वेळोवेळी शेअर केला आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही पाहा…रोज मद्य सेवन करणाऱ्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्तीचे निधन; ‘त्यांचे’ कुटुंब पाहिलेत का?

व्हिडीओ नक्की बघा…

७ जानेवारी २०२४ रोजी त्यानं इन्स्टाग्रामवर त्याच्या प्रवासाचा पहिला व्हिडीओ कॅप्शनसह शेअर केला, पार्ट १- मनाली ते कन्याकुमारी अशा १०० दिवसांच्या स्केटबोर्ड प्रवासात तुमचं स्वागत आहे. हा प्रवासाचा पहिला दिवस आहे. धन्यवाद!, अशी कॅप्शन त्यानं व्हिडीओला दिली. तसेच १ एप्रिल रोजी त्यानं स्केटबोर्डवरून कन्याकुमारी गाठली आणि आणखी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिलं, “मनाली ते कन्याकुमारी अशी माझी स्केट जर्नी संपली.”

तसेच यादरम्यान दाट धुक्याच्या रस्त्यांमध्ये गूगल मॅप काम करीत नसल्यामुळे हा प्रवास रितिक क्रॅटझेलसाठी निश्चितच आव्हानात्मक होता, असंसुद्धा त्यानं नमूद केलं आहे. सोशल मीडियावर हे सर्व व्हिडीओ @ritikkratzel या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा अनोखा प्रवास पाहून थक्क होत आहेत आणि या प्रवासाचे विविध शब्दांत कौतुक करीत आहेत.