MongooseAttack Snake Viral Video: साप आणि मुंगूस यांच्यात जन्मोजन्मीचे वैर आहे. एकमेकांचे शत्रू असणारे हे दोघे जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाणार हे निश्चित असते. या लढाईमध्ये एक जीव वाचवण्यासाठी, तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतो. त्यात साप हा अतिशय विषारी प्राणी आहे, ज्याच्या दंशाने मनुष्याचा नाही, तर प्राण्याचाही उपचारांअभावी मृत्यू होऊ शकतो; पण मुंगुसासमोर त्याचं काहीच चालत नाही. कारण मुंगूसाला आपल्या धारधार दातांनी सापाला गंभीर जखमी करु शकतो. तसेच मुंगूस सापापेक्षा चपळ असतो. जो सहस उड्या मारुन सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करु शकतो. त्यामुळे मुंगूस मृत्यूची पर्वा न करता, सापाशी भिडतो. सध्या सोशल मीडियावर साप आणि मुंगुसाच्या लढाईचा असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला पाहताच मुंगूस चवताळतो आणि नंतर तो असं काही करतो की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रुत्वामागे अनेक कारणं दिली जातात. एका मान्यतेनुसार, मुंगूस त्याच्या पिल्लांच्या रक्षणासाठी सापावर हल्ला करतो. सापाला त्याच्याशी लढायचे नसते; पण स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी जंगलात लढावे लागते. यात मुंगूसाच्या चपळतेपुढे सापाचे काहीच चालत नाही, पण किंग कोब्रा किंवा अतिशय विषारी सापांच्या दंशात मुंगूसाचा मृत्यू होऊ शकतो. पण आत्तापर्यंत सापाच्या हल्ल्यात मुंगूसाचा मृत्यू झाल्याचे सहसा घडत नाही. दरम्यान, या व्हिडीओतही रस्त्याच्या मधोमध एक साप आणि मुंगूस एकमेकांशी लढताना दिसतायत.
मुंगूस सापाची मान पकडण्याचा प्रयत्न करतो अन्….
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, साप रस्त्यावर आपला फणा पसरून बसला आहे. पण, सापाला पाहताच मुंगूस चवताळतो आणि धावत येऊन थेट हल्ला करतो. मुंगूस सापाची मान पकडण्याचा प्रयत्न करतो; पण साप बचावासाठी आक्रमक होताना दिसतो. वारंवार सापाच्या मानेवर हल्ला केल्यानंतर अखेर मुंगूस सरळ त्याच्या फण्याचा चावा घेतो. मुंगूस सापाचा फणा जबड्यात इतक्या मजबूतपणे पकडतो की, साप स्वतःला वाचविण्यासाठी धडपडतो. परंतु मुंगूस पूर्ण ताकदीने आणि चपळतेने त्यावर हल्ला करीत राहतो. शेवटी मुंगूस सापाला हरवतो.
साप आणि मुंगुसाच्या लढाईचा हा थरकाप उडविणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @Arhantt_pvt नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून अनेक जण चकित झाले आहेत. तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, रस्त्यावर या दोघांमध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि मला पहिल्यांदाच कळले आहे की, ते इतके धोकादायक असू शकते. तर दुसऱ्याने लिहिलेय की, तुम्ही काहीही म्हणा, मुंगुसाने सापाला ज्या पद्धतीने हरवले, ते फारच भयानक होते. शेवटी एकाने लिहिले की, या लढाईचा निकाल निश्चित होता. साप तिथून निघून गेला पाहिजे होता.