Video: साप कात टाकतानाचा TikTok व्हिडिओ व्हायरल

साप कात का टाकतो तुम्हाला ठाऊक आहे का?

TikTok व्हिडिओ व्हायरल

साप असं म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. सापाच्या विशिष्ट प्रजातीच विषारी असतात तरी अनेकांना सापांची भिती वाटते. अनेकदा याच भितीमुळे सापांचा नाहक जीव घेतला जातो. अनेकदा साप चावल्याच्या भितीनेच रुग्ण दगावल्याचेही आपण वाचतो. चित्रपट, मालिकांमध्येही साप आणि नाग हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी नाग आणि नागीन किंवा सापांवर आधारित अनेक चित्रपट आपल्याला पहायला मिळतात. यामुळेच सापांबद्दल अनेकांना आजही कुतूहल आहे. सापाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.

सापाबद्दल सर्वाधिक कुतूहल असणारी गोष्ट म्हणजे त्याची कात. साप कात टाकतो म्हणजे नक्की काय करतो हे अनेकांना ठाऊक नसतं. मात्रा ग्रामीण भागामध्ये सापाने टाकलेली कात अनेकदा शेतांच्या बांदावर वगैरे दिसून येते. असं असलं तरी शहरी भागातील लोकांना सापा कात टाकतो म्हणजे काय होतं हे ठाऊक नसतं. पण सध्या टीकटॉक या अॅप्लिकेशनवर सापाचा असाच एक कात टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला ३० लाख जणांनी लाईक केलं असून पाच हजारहून अधिक जणांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

@brianbarczykSoothing sounds of a snake shedding! #asmr #snake #shed #reptile #animal #4u

original sound – brianbarczyk

कात कशापासून बनलेली असते?

प्रत्येक साप ठराविक कालावधीच्या अंतराने आपली कातडी बदलतो. यालाच आपण ‘कात टाकणे’ म्हणतो. साप कात टाकतो त्याचे कारण म्हणजे सापाच्या त्वचेचे बाह्य आवरण हे केराटिनचे बनलेले असते. ते कधी वाढत नाही. आपली नखे आणि केसही केराटिनपासून बनलेले असतात. या कातीचा कसलाही औषधी उपयोग नाही. बरेचदा सापाची कात औषध म्हणून विकली जाते. ही कात अप्र्वतक असते. तिच्यावर तिरकस उजेड पडला तर ती चमकते. असा डोक्यावर राहिलेला कातीचा एखादा तुकडा तिरकस उजेडामध्ये चमकू शकतो अनेकदा यालाच नागमणी असे समजले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Snake remove skin tiktok video goes viral scsg

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या