Snakes Viral Video : सापाचे नाव ऐकले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. हा सरपटणारा प्राणी कधी कुठेही जाऊन राहू शकतो, त्यामुळे इतर प्राण्यांप्रमाणे माणसालाही त्यापासून सतर्क राहावे लागते. काहींना हा प्राणी आवडत असला तरी अनेकांना तो जीवघेणा आणि फार भीतीदायक वाटतो. कारण सापाच्या एका दंशाने क्षणात माणसाचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे लोक सापापासून अंतर ठेवून राहतात. हा सरपटणारा प्राणी असल्याने तो अनेकदा मानवी वस्तीतदेखील शिरतो. पण, असेच धोकादायक डझनभर साप तुमच्या घरात लपले असतील तर? विचार करूनच थरकाप उडाला ना.

पण, अशी एक घटना समोर आली आहे, जी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला घरातील एका बॅगच्या खालून चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. जेव्हा त्याला बॅगखाली काहीतरी वेगळी गोष्ट दिसली, तेव्हा त्याने सर्पमित्राला फोन केला. सर्पमित्राने बॅग उचलताच तिथे असे काही दिसले जे पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

बॅगेखालून निघाले डझनभर साप

हा व्हिडीओ सर्पमित्राने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक मोठी हिरवी बॅग दिसत आहे, ती काढताच तेथे अनेक साप दिसत आहेत. या बॅगखाली एक-दोन नव्हे तर चक्क डझनभर साप आपले घर समजून राहत होते. सर्व साप आकाराने खूपच लहान होते. बॅग काढताच साप इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करताना दिसतात, जे पाहताना तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा- Video : “हे माझं रोजचच काम…”, दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या इन्फ्लुएन्सर रजत दलालने दाखविला माज; युर्जस म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे, ज्याला पाच कोटींहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. लोक व्हिडीओवर कमेंट करून आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, हे साप विषारी नाहीत, त्यांना जंगलात सोडा. दुसऱ्याने लिहिले आहे की, व्हिडीओ पाहूनच मी घाबरलो. तिसऱ्याने लिहिले आहे की, मित्रा, या निष्पाप जीवांना वाचवून तू खूप छान काम करत आहेस.