Mother son emotional video: आई आणि मुलाचं नात खास असतं, मुलाचं एकवेळ बाबांसोबत पटणार नाही मात्र आईसोबत त्यांचं बाँडिंग खास असतं. जशा मुली बाबांच्या लाडक्या तशी मुलं आईची लाडकी असतात. दरम्यान मुलगा कितीही लाडका असला तरीही एका वेळेनंतर त्याच्यावर घरची जबाबदारी येतेच. यासाठी अनेकवेळा मुलांना शिक्षणासाठी, नोकरी धंद्यासाठी बाहेर गावी घर सोडून जावं लागतं. अशाच एका बाहेरगावी राहणाऱ्या मुलानं ३ वर्षांनी अमेरिकेवरून येत आईला भन्नाट सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल झाला आहे.
आपल्या मुलाने खूप मोठं व्हावं, नाव कमवावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. काबाडकष्ट करून ज्या मुलाला शिकवलं, वाढवलं तो पुढे आपल्या पायावर उभा राहिला हे पाहताना आई-वडिलांना मिळणारा आनंद फार वेगळा असतो. पण, तोच मुलगा आयुष्यभर आपल्यासाठी राबलेल्या आई-वडिलांच्या आनंदासाठी जेव्हा काही करतो ते पाहून आई-वडिलांचा उरही अभिमानाने भरून येतो, त्यांना आयुष्यात समाधानी असल्याचे सुख मिळते.
लेक ३ वर्षांनी भारतात आला
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन वर्षांपासून घारापासून दूर अमेरीकेत राहणारा मुलगा अचानक भारतातील त्याच्या घरी येतो. आणि त्याला अंगणात पाहून आईला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आई आपल्या लेकाला मिठी मारते आणि रडू लागते. एवढे दिवस लांब असलेलं लेकरू आलेलं पाहून आईला आनंदअश्रू अनावर झाले आहेत. तीन वर्षांपासून न दिसलेला मुलगा अचानक समोर येतो, हे सगळं पाहून तिला विश्वासच बसत नाही. यावेळी दोघांच्याही डोळ्यात आनंदअश्रू दिसत आहेत. हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेला राहतो, मात्र अचानक काहीही कल्पना न देता हा थेट आईला भेटायला आला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर priyanka__shende_ नावाच्याइन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअक केल आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “आज माझा भाऊ ३ वर्षांनी अमेरिकेवरून अचानक परत आला आणि सर्वांना सुखाचा धक्काच दिला आईचे आनंदअश्रू थांबतच नव्हते” लिहलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पाठीचा कणा वाकला तरी पोराच्या शिक्षणासाठी धडपडणारा ड्रायवर बाप; VIDEO पाहून कळेल बाप काय असतो
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या तरुणाचं कौतुक करत आहेत तर, आई ही आईच असते अशी कमेंट एकानं केली आहे.हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी, भावा तुझा अभिमान आहे, ग्रेट सरप्राईज म्हणत त्याचे कौतुक केले आहे.
