scorecardresearch

दक्षिण आफ्रिकेच्या छेदी सिंगला पाहून सोनू सूदही पडला चाट; दिली बॉलिवूडची ऑफर

नुकताच सोनुने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या छेदी सिंगला पाहून सोनू सूदही पडला चाट; दिली बॉलिवूडची ऑफर 
(Photo : Twitter/ @SonuSood)
दक्षिण आफ्रिकेच्या छेदी सिंगला पाहून सोनू सूदही पडला चाट; दिली बॉलिवूडची ऑफर (Photo : Twitter/ @SonuSood)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचे जगभरात अनेक चाहते आहेत. लोक त्याच्या अभिनयावर तर प्रेम करायचेच, पण गेल्या दोन वर्षात त्याने समाजासाठी जे काही काम केलंय त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. करोना काळात त्याने अनेक लोकांची मदत केली. यामुळे लोकांच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळंच स्थान निर्माण झालंय. फक्त बंगाल आणि बिहारच नाही तर संपूर्ण देशातील जनता सोनू सूदला देव मानायला लागली आहे. यानंतर सोनुने राजकारणातही उतरावं असा सल्ला अनेकांनी त्याला दिला. परंतु सोनुने यावर नकार दिला.

नुकताच सोनुने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की सोनू एका परदेशी व्यक्ती सोबत बसला आहे. अशातच आपल्याला ‘हा व्यक्ती कोण आहे?’ असा प्रश्न पडला असेल.

Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

Video : इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना आधार देणाऱ्या त्रिवेणी आचार्य । गोष्ट असामान्यांची: भाग १९

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा परदेशी व्यक्ती एका खुर्चीत झोपला आहे. तिथे सोनू येतो आणि त्याला इंग्रजीमध्ये आपले पाय सरळ करायला सांगतो. यावर हा व्यक्ती परदेशी छेदी सिंगच्या स्टाइलमध्ये सोनूला उत्तर देतो. तो म्हणतो, ‘कानून के हाथ और सोनू सूद की लात दोनों बहुत लंबी हैं. भैया…भैया जी स्माइल’. यावर सोनू सूद आपला डायलॉग बोलतो.

२०१० साली प्रदर्शित झालेला दबंद चित्रपट फारच गाजला होता. यामध्ये सलमान खान हा मुख्य भूमिकेत तर सोनू सूद खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला. या चित्रपटात सोनूने छेदी सिंग ही भूमिका साकारली होती. या चित्रपटासोबतच यातील डायलॉग आणि सीन फार लोकप्रिय ठरले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2022 at 11:16 IST

संबंधित बातम्या