सोशल मीडियावर दररोज अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ लंडनमधील विमानतळावरील असल्याचे बोलले जात आहे. जिथे लोक विमानतळावरच्या लगेज बेल्टवर आपले सामान येण्याची वाट पाहत उभे होते. दरम्यान, सामानाच्या बेल्टवर एक विचित्र वाकलेली वस्तू येताना दिसली. या विचित्र वस्तूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या बेल्टवर आलेले सामान बघून तुम्हालाही एखाद्या व्यक्तीला गुंडाळून पॅक केल्यासारखे वाटेल. पॅक करण्यासाठी, त्यावर बरेच वर्तमानपत्र गुंडाळलेले दिसत आहेत आणि नंतर ते टेपने घट्ट चिकटवले आहे. लगेज बेल्टवर अशा प्रकारे भरलेले हे सामान पाहून लोकांना धक्काच बसला.

( हे ही वाचा: Video: दारूच्या नशेत चौघींनी मिळून एकीला बेदम मारले; भररस्त्यातच सुरू केला लाथेचा आणि बेल्टचा मार)

व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्की काय होतं सामानात?

लगेज बेल्टवर फिरत असलेल्या या विचित्र वस्तूचा व्हिडिओ ‘व्हायरलहॉग’ नावाच्या ट्विटर हँडलने पोस्ट केला आहे. या ट्विटर हँडलनुसार, लगेज बॅगेवर दिसणारी ही वस्तू प्रत्यक्षात एक लॅम्प आहे. म्हणजेच, असा लॅम्प ज्यामध्ये एक ह्यूमन पॉश्चर फिट केला असेल. यामुळेच त्याचे पॅकिंग विचित्र दिसते. व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वजण या सामानाकडे कशाप्रकारे पाहत आहेत.