Student Exam Center Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक निरनिराळे घटक व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात; तर कधी जुगाड. कधी कधी काही लाइव्ह घटनादेखील व्हायरल होतात, ज्यातील एक्सक्लुजिव्ह फुटेज लोकांना थक्क करून सोडते. जगभरात असे अनेक लोक आहेत की, जे कधी कधी अशी विचित्र कामे करतात की, जी आश्चर्यचकित करणारी असतात आणि बऱ्याचदा ती इतकी अनोखी असतात की, ती पाहून आपल्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. आता असा काहीसा प्रकार समोर आला आहे. जे पाहून नेटकरीही विचारात पडले आहेत. नेमके काय घडले ते जाणून घेऊ…

सोशल मीडियाच्या गल्लीबोळात कधीच कंटेंटची कमतरता नसते. तुम्ही जितक्या वेळा येथे जाल, तितक्या वेळा तुम्हाला काहीतरी वेगळे आणि अनोखे पाहायला मिळेल. जर तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि नियमितपणे सक्रिय असाल तर तुम्ही पाहिले असेल की, लोक किती गोष्टी पोस्ट करतात. त्यापैकी काहीतरी खूप वेगळे आहे किंवा लोकांचे लक्ष वेधून घेते ते व्हायरल होते. तरीही आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो सर्वांपेक्षा वेगळा आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दाखवण्यात आले?

जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्हाला कळेल की, परीक्षेचा दबाव वेगळा असतो. विद्यार्थी असलेले सर्व जण याच्याशी सहमत असतील. परीक्षा देताना, लोकांचे पूर्ण लक्ष त्यांनी अभ्यासलेल्या गोष्टींवर असते; जेणेकरून ते त्या विसरणार नाहीत आणि पेपर हातात आल्यावर ते शक्य तितक्या लवकर प्रश्नांची उत्तरे लिहू लागतात. पण व्हिडीओमध्ये दिसतंय की एक मुलगा पेपर देण्यासाठी बसला आहे; पण त्याला पेपर लिहिण्यापेक्षा तंबाखू खाण्यात जास्त रस आहे. तो आधी तंबाखू काढतो, नंतर चुना काढतो आणि त्यानंतर तो तंबाखू हातावर मळायला सुरुवात करतो. असो; पण तो व्हिडीओमध्ये तंबाखू खाताना दिसत नाहीये. पण खरंच परीक्षागृहात हे सगळं करण्याची काय गरज होती, असे प्रश्न नेटकरी विचारतायेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DJOmidWzMBU/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही नुकताच पाहिलेला व्हिडीओ being_soniaviharr नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट करीत लिहिले, “आता मृत्यूचा खेळ होईल.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “मी आधी गुटखा खातो,नंतर पेपर पाहतो.” तर तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “आता गुपचूप फसवणूक होईल”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.