scorecardresearch

विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलं ‘भगवान है कहां रे तू’, शिक्षकाचीही भन्नाट टिप्पणी; Video पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

शेवटच्या प्रश्नाचे उत्तराच्या जागी विद्यार्थ्याने पीके चित्रपटातील ‘भगवान है कहां रे तू’ गाणं लिहिलं आहे.

Funny viral answer sheet
काही विद्यार्थ्यांचे पेपर चेक करणे म्हणजे शिक्षकांचीच परीक्षा असते. (Photo : Instagram)

आता जवळपास अनेक शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यामुळे आता शिक्षकांचे पेपर तपासणीचं काम सुरु झालं आहे. अनेक मुलांचे पेपर चेक करणे म्हणजे शिक्षकांचीच परीक्षा असते, कारण काही विद्यार्थी उत्तर पत्रिकेत आम्हाला पास करा वगैरे लिहितात. तर अनेकवेळा विद्यार्थी काहीही निराधार गोष्टी पेपरमध्ये लिहित असतात. अशा अनेक मजेदार पेपरचे फोटो इंटरनेटवर व्हायरलही होतात. सध्या अशाच एका विद्यार्थ्याचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरण कठीण झालं आहे. कारण या विद्यार्थ्याने पेपरमध्ये उत्तरं लिहिण्याऐवजी चक्क हिंदी सिनेमातील गाणी लिहिली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठातील एका विद्यार्थ्याचा हा पेपर असून त्याने पेपरमध्ये हिंदी सिनेमातील गाणी लिहून उत्तरपत्रिका भरली आहे. या विद्यार्थ्याच्या पेपरचा एका शिक्षकांनी व्हिडीओ शूट केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही उत्तरपत्रिका पाहून अनेकजण पोट धरुन हसत आहेत. या विद्यार्थ्याने त्याच्या उत्तरपत्रिकेत फक्त तीनच उत्तरे लिहिली आहेत आणि सर्वच खूप मजेशीर आहेतच, पण या मुलाला मार्क देणाऱ्या शिक्षकांनी असा काही पेपरमध्ये लिहिलं आहे जे वाचून अनेकजण शिक्षकांचं कौतुक करत आहेत.

हेही पाहा- ‘वो स्त्री है…’ साडी नेसून महिलांनी गाजवलं फुटबॉलचं मैदान, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

विद्यार्थ्याने प्रश्नांची उत्तर काय लिहिली आहेत ते पाहूया –

पहिल्या प्रश्नाचं उत्तर –

व्हिडिओमध्ये , विद्यार्थ्याने थ्री इडियट्स चित्रपटातील ” “Give Me Some Sunshine, Give Me Some Rays…” हे गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाला उद्देशून उत्तर लिहिले आहे. विद्यार्थ्याने शिक्षकांना ‘हुश्शार’ म्हणत कौतुक केलं आहे. तर मी अभ्यास केला नाही ही माझी चूक असल्याचंही त्याने मान्य केले आहे . विद्यार्थ्याने लिहिले आहे, “मॅडम, तुम्ही एक अप्रतिम शिक्षिका आहात… मी मेहनत करू शकत नाही ही माझी चूक आहे, देवा, मला अभ्यासात थोडी प्रगती दे”

हेही वाचा- मुलगा करोडपती, नातू IAS तरीही आजी-आजोबांच्या नशीबी नव्हती दोन वेळची भाकरी; आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी वाचून डोळ्यात येईल पाणी

शेवटचे उत्तर –

शेवटच्या प्रश्नाचे उत्तराच्या जागी विद्यार्थ्याने पीके चित्रपटातील ‘भगवान है कहां रे तू’ गाणं लिहिलं आहे. विद्यार्थ्याचे हे हास्यास्पद आणि निरर्थक उत्तर शिक्षकांना प्रभावित करू शकले नाहीत. शिक्षकाने याच उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर लिहिले, “चांगला विचार केला, पण इथे काही चालू शकले नाही,” शिवाय शिक्षकाने पुढच्या पानावर लिहिलं की, “तुम्ही इतर उत्तरं (#गाणी) लिहायला पाहिजेत.” इंस्टाग्रामवरील हा उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 19:07 IST

संबंधित बातम्या