टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान सामना जिंकल्यानंतर मैदानात प्रेक्षकांचा एकच जल्लोष सुरु असताना मराठी तरुणदेखील यात सहभागी होते. त्यांचा मैदानातील व्हिडीओ भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला आहे.

या व्हिडीओत तरुण भारताचा विजय होताच जल्लोष करताना दिसत आहेत. यानंतर ते अफजलखान वधाचं पोस्टर काढून झळकावतात. तसंच ‘जय शिवराय’ घोषणा देत झेंडाही फडकवताना दिसत आहेत.

“खड्ड्यात गेली खिलाडूवृत्ती,” हार्दिक पांड्याने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला “जर नियम आहे तर…”

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर PCB चे प्रमुख रमीज राजा यांचं ट्वीट, म्हणाले “खेळ कधी क्रूर आणि अन्यायकारक…”

नितेश राणे यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून ‘जय शिवराय’ असं म्हटलं आहे.

मेलबर्नमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

IND Vs PAK Highlight: और इनको काश्मीर चाहिए; पाकिस्तानचा झेंडा भर मैदानात उलटा..Video झाला Viral

पाकिस्तानने भारतासमोर १६० धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाची सुरूवात खराब झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी ४ धावा करून माघारी परतले होते. नसीम शाहने केएल राहुल तर हारिस रौफने कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र १० चेंडूत १५ धावा केल्यानंतर हारिस रौफने त्याला तंबूत पाठवलं. अक्षर पटेलला बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. मात्र तो केवळ दोन धावा करून बाद झाला. दरम्यान विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. तसंच हार्दिक पंड्याने ४० धावांचे योगदान दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटच्या षटकामधील थरार

भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने पहिल्या चेंडूवर हार्दिकला (३७ चेंडूंत ४० धावा) बाद केले. हार्दिक आणि कोहलीने ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मिळून तीन धावाच निघाल्या. मात्र, नवाजचा पुढील चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. कमरेवरील हा चेंडू कोहलीने सीमारेषेबाहेर पोहोचवला. त्यानंतर नवाजने वाइड चेंडू टाकला. भारताला तीन चेंडूत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा मिळाल्या. पुढील चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. मात्र, त्यानंतर वाइड चेंडू आणि मग अश्विनने एक धाव काढून भारताचा विजय सुनिश्चित केला.