करोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं जगाला ग्रासलं आहे. या महामारीला थांबवण्यासाठी सामाजिक अंतर पाळा, २० सेंकदापर्यंत हात धुवावेत, चेहऱ्यावर मास्क लावा तसेच हात सतत चेहऱ्यावर लावू नका यासारखे सल्ले जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संघटना वांरवार देत आहे. पण पाकिस्तानमधील एका मंत्र्यांनी अजबच सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यामुळे पंतप्रधान इम्रान खानही ट्रोल होत आहेत.

पाकिस्तानची पत्रकार नायला इनायत यांनी नुकताच डॉ. फिरदौस आशिक अवान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डॉ. फिरदौस आशिक अवान इम्रान यांच्या सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री आहेत. नायला यांनी व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ”फिरदौस का कहना है कि वायरस नीचे से भी आ सकता है.”
फिरदौस यांच्या या अजब वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत असून सोशल मीडियावर त्यांच्यावर हसत आहेत. फिरदौस यांनी दिलेला हा सल्ला पुर्णपणे चुकीचा असून जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या सुचनेत बसत नाही.

व्हिडिओत फिरदौस म्हणतात की, ‘आपका जिस्म हो, टांगे हो, वो भी प्रोटेक्ट हों. यह नहीं कि मैं अपने चेहरे को प्रोटेक्ट कर लूं तो वायरस नीचे से आ जाएगा. यह चीजें आपको साथ-साथ चलानी हैं. यह भी एक मेडिकल साइंस है और हमें इसके लिए मिलकर काम करना है.’

१८ एप्रिल शनिवारी ट्विटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ८० हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये रविवारी करोना व्हायरसचे नवीन ८६९ रूग्ण आढळले आहेत. पाकिस्तानमध्ये करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. करोनाग्रस्तांची संख्या ८३४८ झाली आहे.