चहा हे भारतीयांचे आवडते पेयं आहे. अगदी सकाळी उठल्यापासून दिवभरातील कामांमधील ब्रेकमध्ये अनेकवेळा चहा पिण्याची सवय अनेकांना असते. काहींना तर जेवल्यानंतरही चहा पिण्याची सवय असते. अशाप्रकारे चहाप्रेमी कोणत्याही वेळी चहा पिण्यासाठी एका पायावर तयार असतात. तसेच चहा बनवण्याचे वेगवेगळे प्रकारही सोशल मीडियावर शेअर केले जातात, ज्यामध्ये वेगवेगळ्या कल्पनांचा समावेश असतो. अशाच एका भन्नाट कल्पनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काय आहे ही कल्पना जाणून घ्या.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये चक्क नारळाच्या करवंटीमध्ये चहा बनवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये खोबरे काढलेली एक नारळाची रिकामी करवंटी घेण्यात आलेली दिसत आहे. ही करवंटी गॅसवर ठेऊन त्यात पाणी, आलं, दूध, साखर, चहा पावडर असे चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी टाकण्यात आल्या आणि चहा बनवण्यात आला. हा चहा उकळताना पाहून तुम्हालाही याची चव चाखण्याची इच्छा होईल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: दारू पिऊन मुंबईकर तरुणीने बंगळूरमधून बिर्याणी केली ऑर्डर; झोमॅटोचं बिल पाहून तुम्हीही थक्क व्हाल
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा: काळ आला होता पण…; व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले ‘यासाठी कृतज्ञता…’
हा व्हिडीओ कविता राय या इन्स्टाग्राम युजरने ‘इजी कुकिंग विथ कविता’ या अकाउंटवरून शेअर केला आहे. यावर स्वयंपाकाशी निगडीत अनेक रेसीपी शेअर करण्यात येतात. चहाप्रेमींना ही भन्नाट कल्पना आवडली असुन, अनेकांनी यावर कमेंट करत कल्पनेचे कौतुक केले आहे. काही नेटकऱ्यांना मात्र ही संकल्पना पटली नसुन, अशा प्रकारच्या प्रयोगामुळे स्वयंपाक घरात आग लागू शकते, अशी शक्यता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.