Terrifying Funeral Accident Video : कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या धर्मानुसार, विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. कुटुंबातील मंडळी, नातेवाईक मिळून मृत व्यक्तीचा अंत्यविधी पार पाडतात. अशाचप्रकारे एका स्मशानभूमीत एका मृतदेहावर दफन विधी करण्याची तयारी सुरू होती. यावेळी अशी एक धक्कादायक घटना घडली की पाहून तुम्हालाही भीती वाटेल. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

खड्ड्याजवळ अंथरलेल्या कार्पेटवरून नातेवाईकांचा पाय घसरला अन्

डेली मेलच्या वृत्तानुसार, २१ मार्च रोजी बेंजामिन एव्हिल्स नावाच्या एका व्यक्तीचे ह्रदयरोगामुळे निधन झाले. यावेळी मृतदेह दफन करण्यासाठी बेंजामिनमधील ग्रीनमाउंट स्मशानभूमीत नेण्यात आला होता. मृत व्यक्तीची मुलं आणि काही नातेवाईक शवपेटी घेऊन खणलेल्या खड्ड्याजवळ पोहोचले. मात्र, खड्ड्याजवळ लाकडी फळ्यांवर अंथरलेल्या कार्पेटवरून नातेवाईकांचा पाय घसरला आणि सर्वजण खणलेल्या खड्ड्यात कोसळले. या अपघातात अनेकांच्या हाता-पायांना आणि पाठीला दुखापत झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मृत व्यक्तीचा मुलगा सर्वात आधी खड्ड्यात कोसळला. यानंतर त्याच्या अंगावर शवपेटी आणि काही नातेवाईक पडले.

मृताची सावत्र मुलगी मेरीबेल रॉड्रिग्ज म्हणाली की, माझ्या भावाच्या अंगावर शवपेटी पडली, ज्यामुळे तो खड्ड्यातच बेशुद्ध पडला. त्याचा चेहरा चिखलात रुतला होता. या घटनेवर आता मृताच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेस स्मशानभूमी प्रशासनास जबाबदार धरले आहे, तसेच या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ @CollinRugg नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, लोकही या घटनेवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुर्दैवी म्हणणेही कमी ठरेल”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुटुंबासाठी खूप दुःखद आहे. अंत्यसंस्कार संचालक किंवा स्मशानभूमीने खूप निष्काळजीपणा केला, असे व्हायला नको होते.”