ठाण्यातील पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यात (पेट क्लिनिक) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दवाखान्यात दोन तरुणांनी (कर्मचारी) एका श्वानाला अमानुष मारहाण केली आहे. काल, १३ फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेबद्दल नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच या दोन्ही कर्मचाऱ्यांबद्दल काल पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
ठाण्यातील आर मॉलमध्ये असलेल्या ‘वेटिक पेट’ क्लिनिकमध्ये ही घटना घडली आहे. क्लिनिककडून पाळीव प्राण्यांची देखभाल आणि काळजी घेण्यात येते. पण, व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दोन कर्मचारी श्वानाला मारताना दिसत आहेत. सुरुवातीला एक कर्मचारी श्वानाच्या चेहरा आणि पाठीवर ठोसे मारताना दिसतो आहे. तसेच दुसरा कर्मचारी व्हिडीओ काढताना श्वानाला अमानुष मारहाण करतो आहे. एवढेच नाही, तर जेव्हा श्वान या दोन कर्मचाऱ्यांच्या तावडीतून पळून जात असतो तेव्हा कर्मचारी श्वानाला लाथदेखील मारतो.
हेही वाचा…Valentine’s Day 2024: ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त गूगल शोधणार तुमच्यासाठी जोडीदार; फक्त ‘हा’ एक गेम खेळा
व्हिडीओ नक्की बघा…
ठाण्यातील या पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यात श्वानाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तर, आता यावर ॲक्शन घेऊन पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, पोलिसांनी पाळीव प्राण्यांचा हा दवाखाना बंद केला आहे.
सामान्य नागरिकांपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत अनेक लोकांनी या व्हायरल व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, पोलीस अधिकारी पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यातून कर्मचाऱ्यांना अटक करून घेऊन चालले आहेत आणि परिसरात एकच गर्दी जमली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.