Viral Video : नुकतीच सगळीकडे दिवाळी जल्लोषात साजरी झाली. दिवाळी म्हटलं की गोडधोड आणि फटाके आले पण फटाके फोडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण सह ध्वनी प्रदूषणही होते. फटाके फोडताना घरातील लहान मुले, गर्भवती महिला, वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्याने चक्क पेटलेलं अनार तोंडात धरलंय. पुढे काय होतं, हे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अंगणात अनार पेटवले आहे. तितक्यात एक लहान कुत्रा तिथे येतो आणि चक्क तोंडात पेटलेलं अनार पकडतो. जेव्हा अनार जळायला लागतं तेव्हा कुत्रा तोंडात पेटलेलं अनार पकडून घरात धाव घेतो.हे पाहून मालक धावून येतो आणि कुत्र्याच्या तोंडातील अनार पकडून अंगणात पुन्हा ठेवतो पण कुत्रा पुन्हा तेच पेटलेलं अनार तोंडात पकडतो आणि सैरावैरा पळतो. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुमच्या सुद्धा अंगावर शहारा येईल. फटाके फोडताना काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

हेही वाचा : आजी नातवाचं प्रेम! नातवाला पोळी कशी लाटायची शिकवतेय आजी,व्हिडीओ पाहून आठवेल तुमचे बालपण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

c_r_a_z_y_____boy______122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
खरं तर हा हसण्याचा विषय नसून गंभीर मुद्दा आहे. दरवर्षी फटाक्यांमुळे अनेक प्राण्यांना इजा पोहचते. अशात फटाके फोडताना काळजी घेणे आणि सुरक्षितता जपणे खूप गरजेचे आहे.