जपानच्या राजकुमारी माकोने एका सामान्य व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्यामुळे तिने तिचा शाही दर्जा गमावला आहे. तथापि, राजकन्येचे लग्न आणि तिचा शाही दर्जा संपवण्याच्या मुद्द्यावर जनमत विभागले गेले आहे. इम्पीरियल हाऊसहोल्ड एजन्सीने कळवले की माको आणि तिचा प्रियकर केई कोमुरो यांच्या लग्नाची कागदपत्रे राजवाड्यातील अधिकाऱ्याने मंगळवारी सकाळी सादर केली.

एजन्सीने सांगितले की ते दुपारी पत्रकार परिषदेत या संदर्भात निवेदन जारी करतील, परंतु यावेळी पत्रकारांचे कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. एजन्सीने सांगितले की, पॅलेसच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, माको या महिन्याच्या सुरुवातीला तणावाने ग्रस्त होती, ज्यातून ती आता बरी होत आहे. तिच्या लग्नाबद्दलच्या नकारात्मक बातम्यांमुळे, विशेषतः कोमुरोला लक्ष्य केल्यामुळे माको खूप तणावाखाली होती. लग्नानंतर मेजवानीचे आयोजन केले जाणार नाही किंवा इतर कोणतेही विधी होणार नाहीत.

( हे ही वाचा: वडिलांच्या मृतदेहासमोरच तरुणीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; युजर्सनी फटकारलं )

शिकत असताना राजकुमारी प्रेमात पडली

माको (३०) ही सम्राट नारुहितो यांची भाची आहे. तो आणि कोमुरो यांनी टोकियो येथील आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठात एकत्र शिक्षण घेतले. त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये लग्नाची घोषणा केली, परंतु दोन महिन्यांनंतर कोमुरोच्या आईच्या आर्थिक वादामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र, हा वाद पूर्णपणे मिटला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ३० वर्षीय कोमुरो २०१८ मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता आणि गेल्या महिन्यातच जपानला परतला होता.

जपानी शाही नियमांनुसार एका सामान्य नागरिकाशी लग्न करून, पतीचे आडनाव धारण केल्यानंतर माकोने आता तिचा शाही दर्जा गमावला आहे. कायद्यानुसार विवाहित जोडप्याने आडनाव वापरणे आवश्यक आहे. पॅलेस अधिकाऱ्यांनी सांगितले की माकोने १४० दशलक्ष येन ($१२.३ दशलक्ष) स्वीकारण्यासही नकार दिला. दुसर्‍या महायुद्धानंतर राजघराण्यातील ती पहिली सदस्य आहे ज्यांना तिने एका सामान्य व्यक्तीशी लग्न केले तेव्हा भेट म्हणून कोणतेही पैसे मिळाले नाहीत.

( हे ही वाचा: T20 World Cup 2021: पहिल्या लढतीपूर्वी राष्ट्रगीतादरम्यान अफगाणिस्तानच्या कर्णधाराला अश्रू अनावर! )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमारीचा दर्जा आता मिळणार नाही

मंगळवारी सकाळी ती फिकट निळ्या रंगाचा ड्रेस आणि हातात पुष्पगुच्छ परिधान करून राजवाड्यातून बाहेर पडली. तेथे तिने तिचे पालक क्राउन प्रिन्स अकिशिनो, क्राउन प्रिन्सेस किको आणि तिची बहीण काको यांची भेट घेतली. ‘इम्पीरियल हाऊस’ कायद्यानुसार, राजघराण्यातील महिला सदस्यांनी सामान्य नागरिकाशी लग्न केल्यास त्यांना त्यांचा शाही दर्जा गमवावा लागतो.या प्रथेमुळे राजघराण्यातील सदस्य कमी होत असून गादीवर वारसदारांची कमतरता आहे. नारुहितो यांच्यानंतर केवळ अकिशिनो आणि त्यांचा मुलगा प्रिन्स हिसाहितो हेच उत्तराधिकाराच्या शर्यतीत आहेत.