scorecardresearch

T20 World Cup 2021: पहिल्या लढतीपूर्वी राष्ट्रगीतादरम्यान अफगाणिस्तानच्या कर्णधाराला अश्रू अनावर!

टी-२० विश्वचषक स्पर्धेत अनेक देशाचे क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत, देश कठीण परिस्थिती असतानाही अफगाणिस्तानचा संघ देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

Mohammad Nabi
भावनिक व्हिडीओ व्हायरल (फोटो: @KhalidPayenda/ Twitter)

संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जात आहे. जगातील अनेक देशांचे क्रिकेट संघ यात सहभागी होत आहेत. यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाचा समावेश आहे, जो कठीण परिस्थिती असतानाही आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. सोमवारी अफगाणिस्तानने स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरले. सामन्यापूर्वी संघाने अफगाणिस्तानचे राष्ट्रगीत गायले आणि आपल्या देशाचा ध्वज फडकावला. अफगाणिस्तानमध्ये कट्टरपंथी दहशतवादी संघटना तालिबानच्या ताब्यात असल्याने अफगाणिस्तानच्या जनतेसाठी हा भावनिक क्षण होता.

व्हिडीओ व्हायरल

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘अफगाणांसाठी एक भावनिक दृश्य. जागतिक मंचावर अफगाणिस्तानचा सुंदर ध्वज मंत्रमुग्ध करणाऱ्या राष्ट्रगीतासह पाहणे खूप छान वाटले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. #AFGvSCO #T20WorldCup’. हा व्हिडीओ अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला साहेल यांनीही रिट्विट केला असून, ते सतत तालिबान आणि पाकिस्तानला लक्ष्य करत आहेत.

( हे ही वाचा:‘Squid Game’ मध्ये पाकिस्तानी व्यक्तीच्या भूमिकेत दिसलेला ‘हा’ भारतीय अभिनेता आहे तरी कोण? )

( हे ही वाचा: Gold: सर्वात स्वस्त सोनं ‘इथे’ उपलब्ध; १० ग्रॅमवर बंपर सवलत! )

क्रिकेटच्या नायकांना सलाम

या ट्विटमध्येही त्यांनी पाकिस्तानला तालिबानचा मित्र म्हटले आहे. सालेहने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आमच्या क्रिकेट नायकांच्या धैर्याला आणि राष्ट्रीय मूल्यांप्रती त्यांच्या समर्पणाला मी सलाम करतो. त्यांनी राष्ट्रगीत गायले आणि पाकिस्तान समर्थित तालिबान दहशतवादी अत्याचाराविरोधात राष्ट्रध्वज उंचावला. त्यांनी लिहिले की, ‘तालिबान राजवटीला स्वत:चा आवाज नाही आणि त्यात एक पंतप्रधान आहे ज्याचा सीव्ही नाही आणि आवाजही नाही.’

संघाचा धाडसी निर्णय

काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने देशात शरिया कायदा आणि तालिबानी झेंडा लागू केला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान संघाचा हा निर्णय अतिशय धाडसी आहे. सालेहने ४९ दिवसांनंतर ट्विटरवर पुनरागमन करत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अडीच महिन्यांनंतर देशातील परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या काबूल दौऱ्यावर सालेह यांनी अफगाण व्हिसाशिवाय काबूल गाठल्याचा आरोप केला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-10-2021 at 12:39 IST
ताज्या बातम्या