नृत्य ही अशी कला आहे ज्यासाठी खूप कौशल्य लागते. भारतात कथक, भरतनाट्यम, ओडीसी, लावणी असे पारंपारिक नृत्याचे अनेक प्रकार आहेत. ही नृत्य सादर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खूप सराव करावा लागतो , त्यानंतर हे कौशल्य आत्मसात करता येते. शास्त्रीय नृत्य ही अत्यंत अवघड आहे, ज्यामध्ये नृत्यासह हावभाव देखील महत्त्वाचे ठरतात. सध्या सोशल मीडियावर शास्त्रीय नृत्य करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाने इतके अप्रतिम नृत्य सादर केले आहे. तरुणाच्या नृत्याने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

इंस्टाग्रामवर itsatrangimemer हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण भुलभुलैया चित्रपटातील “आमी जे तोमार”या गाण्यावर नृत्य सादर करताना दिसत आहे. तुम्ही भुलभुलैया चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला माहित असेल चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनने साकारलेली मोंजोलिकाची भुमिका प्रंचड गाजली होती. “आमी जे तोमार” या गाण्यावर मोंजोलिका उर्फ विद्या बालनने अप्रतिम नृत्य सादर करून लाखो लोकांची मन जिंकले होते. काही दिवसांपूर्वी भुलभुलैया पार्ट २ मध्ये याच गाण्यावर अभिनेता कार्तिक आर्यनने देखील नृत्य केले होते ज्याची सर्वत्र चर्चा झाली होती. याच गाण्यावर एका तरुणाने सुंदर नृत्य सादर केले आहे जे पाहून लोक प्रभावित झाले आहेत. तरुणाचे नृत्य अप्रतिम आहे पण त्याचे हावभाव देखील उत्तम आहेत. तरुणाचे इतके सुंदर नृत्य केले आहे त्याला पाहून लोक मोजोंलिकाला विसरून जातील. तरुणाने सुंदर नृत्य करून थेट कार्तिक आर्यनला टक्कर दिली आहे.

हेही वाचा – रुळाजवळ फोटो काढत होती महिला अन् अचानक ट्रेन आली; लोको पायलटने लाथ मारून केले महिलेला बाजूला, पाहा VIDEO

हेही वाचा – धक्कादायक! भररस्त्यात विवस्त्र फिरत होती महिला, Video होतोय Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणाने आपल्या नृत्य कौशल्याने लाखो नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहे. एकाने लिहिले, “त्याचे हावभाव अत्यंत सुंदर आहेत” दुसऱ्याने लिहिले, “भावाने, मनापासून या गाण्यावर नृत्य सादर केले आहे” तिसऱ्याने लिहिले, सुंदर सर, तुमचे नृत्य अप्रतिम होतो, सलाम” चौथ्याने लिहिले, नृत्य कधीही स्त्री-पुरुष असा भेदभाव करत नाही.”