Viral Video : कामाचा अनेक वर्षांचा अनुभव असणारे कामगार, कर्मचारी यांना त्यांच्या कामाची इतकी सवय झालेली असते की, तुम्ही त्यांना कोणतेही काम करण्यास किंवा हिशोब लावण्यास सांगितले तर ते अगदी सहज करून दाखवतात. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती कॅल्क्युलेटरकडे न बघता हिशोब करताना दिसून आली आहे, जे पाहून तुम्ही चकित व्हाल.

व्हायरल व्हिडीओ एका ऑफिसचा आहे. व्हिडीओत काही कामगार ऑफिसच्या बाहेर काम करताना दिसत आहेत. तसेच कदाचित कामगारांचा प्रमुख
व्यक्ती काहीतरी हिशोब करताना दिसतो आहे. व्यक्तीने स्वतःसमोर काही महत्वाचे कागदपत्र ठेवले आहेत आणि हिशोब करण्यासाठी त्याने एका बाजूला कॅल्क्युलेटर ठेवलं आहे; पण कॅल्क्युलेटरकडे न बघता ही व्यक्ती हिशोब करताना दिसते आहे. कॅल्क्युलेटरकडे न बघता हिशोब करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच.

Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा
man opts for papaya over cake on birthday
व्यक्तीने वाढदिवशी केकऐवजी कापली पपई, पण का? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, व्हिडीओ तुफान व्हायरल
terrifying moment man fall off swing
मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

हेही वाचा… ‘मला साबण आवडतो’ म्हणत मुलीने साबणच खाल्ला; Videoची खरी बाजू बघून बसेल धक्का

व्हिडीओ नक्की बघा :

कॅल्क्युलेटरकडे न बघता केला हिशोब :

अनेक वर्ष मेहनतीने काम केल्यामुळे, व्यक्तीला न बघता हिशोब करण्याची सवय लागली आहे. तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्तीचे लक्ष कॅल्क्युलेटरकडे नाही तर हिशोब लिहिलेल्या कागदपत्रावर असते आणि तो फक्त कागदपत्रांकडे बघून कॅल्क्युलेटरवर हिशोब करताना दिसतो आहे, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. कागदपत्रांवर लिहिलेले अंक पाहून व्यक्ती न बघता कॅल्क्युलेटरवर अंकांची बटणे दाबताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @senulover0786 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच अनेक जण कामगारांच्या प्रमुखाचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच ‘हे टॅलेंट नाही तर अनेक वर्षांची मेहनत आहे’, असे अनेक जण आवर्जून व्हिडीओखाली कमेंट करताना दिसून आले आहेत.तसेच काही जण व्यक्तीच्या कौशल्याला दाद देताना दिसून आले आहेत.