कुत्र्याची तहान शमवण्यासाठी चिमुरड्याने लावली ताकद, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

कुत्र्याची तहान शमवण्यासाठी मुलाने सर्व शक्ती पणाला लावली. मुलाच्या मेहनतीच्या या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत.

boy to quench the thirst of the dog
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @ipskabra / Twitter )

लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की मुलं हे देवाचं रूप असतात. लहान मुलं खूप निरागसही असतात. एखाद्या लहान मुलाने एखाद्याला मदत करायला सुरुवात केली तर तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करा. तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल. असाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल कुत्र्याची तहान शमवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्र्याची तहान शमवण्यासाठी मुल पूर्ण ताकदीने हापसा चालवत आहे.

( हे ही वाचा: सनी देओलने चाहत्यांना म्हटले गुड मॉर्निंग, मग मागे उभ्या असलेल्या गायीनेही दिले उत्तर, पहा मजेशीर video )

लोकांची मनं जिंकली

मुलाच्या मेहनतीच्या या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्याने एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कितीही लहान असो, प्रत्येकजण एखाद्याला शक्य तितकी मदत करू शकतो.’

( हे ही वाचा: पठ्ठ्याने जुनी भांडी आणि रिकाम्या बादल्यांनी तयार केले संगीत; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

( हे ही वाचा: रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीने केलं असं काही की, CCTV फुटेज पाहून नेटीझन्स झाले थक्क )

पूर्ण ताकदीने चालवला हापसा

तुम्ही बघू शकता की मूल इतके लहान आहे की त्याला हापसा चालवणे कठीण जात आहे. यानंतरही तो पूर्ण ताकदीने हापसा चालवण्याचा प्रयत्न करत कुत्र्याची तहान भागवत आहे. मुलगा उडी मारून हापसा हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर हापशातून बाहेर पडणारे पाणी कुत्रा पितानाही दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The power of little boy to quench the thirst of the dog you also appreciated watching the video ttg

ताज्या बातम्या