Snake Viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. दरम्यान सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये रेल्वे रुळाखाली येऊन एका सापाचा दुर्दैवी अंत झालाय.
एक साप अशा ठिकाणी गेलाय की तुम्ही विचारही करु शकत नाही. एक साप चक्क रेल्वेच्या रुळावरुन सरकताना दिसला. मात्र पुढ्याच क्षणी भरधाव वेगात ट्रेन आसी आणि सापाला अक्षरश: चिरडून टाकलं. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे रुळावरुन एक साप सरकत जात होता आणि तेवढ्यात समोरुन ट्रेन आली. यावेळी रेल्वे रुळावरुन सरकणाऱ्या सापाला ट्रेननं अक्षरश: चिरडून टाकलं आहे. यामध्ये सापाचा संपूर्ण लगदा झाल्याचं दिसत आहे. अतिशय भयंकर असा हा प्रकार घडला असून हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DKsB5uIvRaG/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने “बापरे किती वेदनादायक मृत्यू आला आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं, सापाचा दुर्दैवी अंत अशी प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली आहे.