सामन्यादरम्यान दोन संघातील प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. परंतु पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच चषकादरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, जेव्हा हिंसाचार इतका वाढला की प्रेक्षकांनी स्टेडियमला ​​आग लावली. यादरम्यान प्रकरण इतके वाढले की, खेळाडू जीव वाचवून सामन्यातून पळताना दिसले.

नक्की काय झालं?

१७ डिसेंबरची ही गोष्ट आहे जेव्हा पॅरिसमधील स्टेड शार्लेटी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हिंसाचारामुळे लियॉन आणि पॅरिस एफसी यांच्यात खेळल्या जाणाऱ्या फ्रेंच कप फुटबॉल सामना थांबवावा लागला. हिंसक प्रेक्षकांनी स्टँडलाही आग लावली, त्यानंतर स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली आणि खेळाडूंसह सर्व प्रेक्षक इकडे-तिकडे धावू लागले.

(हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

सामन्याच्या अर्ध्या वेळेस १-१ अशी बरोबरी असताना दोन्ही संघांचे समर्थक प्रेक्षक गॅलरीत एकमेकांशी भिडले. यादरम्यान स्टेडियममध्ये काही ठिकाणी आगीही लावण्यात आल्या. सेकेंड हाफची सुरुवात सुमारे ५० मिनिटे उशिराने झाली.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हिंसाचार इतका वाढला की काही प्रेक्षकांनी स्टँडला आग लावल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. यानंतर स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली. काही लोक स्टेडियमच्या वरच्या स्टँडच्या जिन्यांवरून पडतानाही दिसले. खालच्या स्टँडमध्ये हिंसक लोकांनी आगही पेटवली.

(हे ही वाचा: टीव्हीवर मांजरीने पक्षी पाहिल्यावर शिकारीसाठी मारली उडी, आणि…बघा Viral Video)

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींचे लोक पैशाच्या बाबतीत मानले जातात खूप भाग्यवान, त्यांना जीवनात मिळतो प्रत्येक आनंद)

हळूहळू आग जमिनीच्या कुंपणापर्यंत पोहोचली. यानंतर सर्व अधिकारी, प्रेक्षक आणि खेळाडू जीव वाचवत धावताना दिसले. अखेर हा सामनाही स्थगित करण्यात आला. यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी सामना स्थगित करण्याची घोषणा केली.