लोकांना बैलांची लढाई आवडते. त्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रमही आयोजित केले जातात. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन बैलांच्या भांडणात तिसऱ्या बैलाने उडी घेतली. व्हिडीओमध्ये दोन पांढऱ्या रंगाचे बैल शेतात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दोन्ही पांढऱ्या रंगाचे बैल आपली शिंग पुढे करून लढत आहेत. यामध्ये अचानक एक काळा बैल त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या भांडणात उडी मारतो.
दोन्ही बैलांच्या भांडणात शिरलेला हा तिसरा बैल एका बैलाल अशा ताकदीने मारतो की तो बाजूला जाऊन पडतो. यासह, दोन बैलांमधील झुंज संपते आणि दोन्ही बैल आपापल्या मार्गाने जातात. पार्श्वभूमीवर दोन माणसे त्यांच्या घोड्यावर बसून लढत पाहताना दिसतात. या बैलांच्या झुंजीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. बैलांची झुंज थांबवण्याची पद्धत लोकांना आवडू लागली आहे.
(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)
(हे ही वाचा: सिंहांच्या कळपाने केली एका जिराफाची शिकार! अंगावर काटा आणणारा Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
लाखो वापरकर्त्यांनी लाइक केलेला हा व्हायरल व्हिडीओ ‘charminganimalsdaily’ या इंस्टाग्राम वापरकर्त्याने अपलोड केला आहे. सोशल मीडियावर बैलांची झुंज पाहणाऱ्यांची स्पर्धा लागली आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना बैलांच्या लढाईत तिसऱ्याची एन्ट्री आवडली. मारामारीचे कारण कळू शकले नाही. प्रत्येकाच्या मते, शांतता राखण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. लोक म्हणतात की कदाचित तो बैल अधिक शक्तिशाली असेल, ज्याच्या भीतीने दोन्ही बैल लढाईतून पळून गेले किंवा कदाचित ते त्याच्या मारहाणीमुळे घाबरले असतील.