Video Viral : असं म्हणतात, संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच.काही लोकांच्या आयुष्यातील संघर्ष पाहून असं वाटते की आपल्या आयुष्यातील दु:ख खूप छोटी आहेत.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हात गमावलेली एक व्यक्ती एका हातने फुलांची सुंदर माळ बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
काही लोकं आयुष्यात कितीही कटू प्रसंग आले तरी हार मानत नाही आणि परिस्थितीचा सामना करतात. असे लोक इतरांसाठी प्रेरणा असतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की खरा संघर्ष तर ही व्यक्ती करत आहे.

या व्हायरलव व्हिडीओमध्ये तुम्हाला एक फुल विक्रेत्याचे दुकान दिसेल. फुल विक्रेता व्यक्तीला एक हात नाही. त्यामुळे तो एका हाताने फुलांची माळ बनवताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो खूप सुंदर माळ बनवतो. त्याने बनवलेली माळ पाहून ही फुलांची माळ विकत घेणारे काका खूप खूष होतात.
या व्यक्तीपासून खरं तर खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्याजवळ दोन हात, दोन पाय, दोन डोळे सर्व काही आहे तरी आपण काहीही करत नाही पण ही व्यक्ती एक हात नसताना सुद्धा केवळ पोट भरण्यासाठी फुले विकताना दिसत आहे. या व्यक्तीचा संघर्ष पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल.

a man dancing with a box of fireworks on his head
धक्कादायक! हातात पेटवलेल्या फटाक्यांची पेटी धरून डान्स करत होता, पुढे असे काही घडले.. VIDEO व्हायरल
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल

rohidaslokhande_21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “संघर्ष” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दादा तुम्ही खूप खंबीर आहात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्हाला बघून नवी उमेद मिळाली. आणखी एका युजरने लिहिलेय, “या व्हिडीओवरुन कळले की जितके मिळाले आहे त्यात आनंदी राहा. स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे जा. आपला आत्मविश्वास आपल्याला शक्ती देतो.” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर करत या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.