आजकाल आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज फसवणुकीच्या बातम्या वाचतच असाल. त्यामध्ये अनेकांना आपली फसवणूक कशी झाली हेही कळत नाही. कारण- अशा प्रकारे चोरी करणारे चोर इतके चलाख झाले आहेत की, ते लोकांची फसवणूक करण्यासाठी रोज वेगवेगळे तंत्र, युक्त्या वापरत आहेत. असाच एक हायटेक चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक हायटेक चोर एटीएम मशीनमधून डेटा कसा चोरी करीत आहे हे पाहू शकता.

एटीएम मशीनमधून अशा प्रकारे होतेय चोरी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक एटीएम मशीन दिसत असेल; त्यात तुम्हाला एक नंबर प्लेटही दिसेल. ही तीच नंबर प्लेट आहे; ज्यावर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी पिन टाकता. आता तुम्ही पुढचा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. तुम्हाला पुढे दिसेल की, व्हिडीओ बनवणारी एक व्यक्ती स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने ती नंबर प्लेट उखडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. काही वेळाने ती नंबर प्लेट पूर्णपणे बाहेर निघते. त्यानंतर तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल की, त्या नंबर प्लेटच्या खाली आणखी एक नंबर प्लेट जोडलेली होती. याचा अर्थ वरती असलेली नंबर प्लेट बनावट होती.

अशा बनावट नंबर प्लेट्समध्ये चिप्स एम्बेड केलेल्या असतात; ज्यामुळे तुमचा डेटा, पिन इत्यादी त्यात सेव्ह होतो. त्यानंतर या सेव्ह केल्या गेलेल्या
डेटाच्या मदतीने तुमची फसवणूक केली जाते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एटीएम मशीनचा वापर कराल तेव्हा एकदा तपासा की, त्या मशीनमध्ये अशी बनावट नंबर प्लेट तर नाही ना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे; जो जवळपास ५८ हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर बहुतेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ही फसवणुकीची वेगळी पद्धत आहे. आणखी एका युजरने लिहिले की, आतापासून मी एटीएम वापरणे बंद करतो.