नाताळनिमित्त शाळा, कॉलेजला असणाऱ्या सुट्ट्या आणि वर्षाच्या शेवटचा महिना असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करताना दिसतायत. अशावेळी प्रवासी स्वस्तात सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वेची निवड करतात. पण, रेल्वेने प्रवास करण्यासाठी तुम्हाला काही महिने आधीच तिकीट बुक करावे लागते. पण, अनेकदा अचानक फिरण्याचा प्लॅन होतो, अशावेळी रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणे फारच अवघड असते. अशावेळी अनेक प्रवासी विनातिकीट, तर काही वेटिंग तिकीटावर आरक्षित डब्यात खाली बसून प्रवास करण्याचा मार्ग निवडतात. यामुळे आरक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात ट्रेनच्या एसी कोचमध्ये विना तिकीट प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आरक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागलो. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटेनवर आता प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय वन सेवेचे अधिकारी आकाश के. वर्मा यांनी ट्रेनच्या एसी कोचमध्ये विना तिकीट प्रवाशांच्या गर्दीचा एक व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. यात व्हिडीओत प्रवासी एसी कोचमध्ये विना तिकीट मिळेल त्या ठिकाणी बसून प्रवास करताना दिसत आहेत. तसेच पूर्ण कोचमध्ये सामानाचा ढीग पाहायला मिळतोय.

joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आयएफएस अधिकारी वर्मा यांच्या संतापलेल्या प्रवासी मित्राने रेल्वे क्रमांक १२३६९ (कुंभा एक्स्प्रेस)मध्ये एसी कोचमधला हा व्हिडीओ त्यांना पाठवला, ज्यानंतर तो त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ट्रेन क्रमांक १२३६९ मध्ये प्रवास करणाऱ्या एका मित्राने एसी २ कोचचा हा व्हिडीओ शेअर केला आहे, जो विना तिकीट चढलेल्या काही प्रवाशांनी हायजॅक केला आहे, या प्रवाशांमुळे आरक्षित तिकिटाने प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यांच्या बर्थमध्ये हे विनातिकीट प्रवासी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, साखळी ओढत आहेत. त्यात विशेषत: ज्येष्ठ नागरिक आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कोच विनातिकीट प्रवाशांनी भरला आहे आणि आरक्षण केल्यानंतरही प्रवास करणारे लोक चिंतेत आहेत. व्हिडीओमध्ये दोन पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

यावर रेल्वे प्रशासनाने आता कारवाईचे आश्वासन दिले आहे. रेल्वे सेवेने त्वरित कारवाईसाठी वापरकर्त्यांना त्यांचा पीएनआर नंबर आणि मोबाइल नंबर शेअर करण्यास सांगितले. रेल्वे प्रशासनाने ट्विट करत लिहिले की, ‘कृपया तुमचा पीएनआर नंबर आणि मोबाइल नंबर डीएमद्वारे शेअर करा, जेणेकरून आम्ही त्वरित कारवाई करू शकू.’

एका युजरने लिहिले की, ‘आजकाल रेल्वे सुरक्षा विनोद बनत आहे.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘दुर्दैवाने कोणीही ऐकत नाही.’ नुकताच मी बीबीएसआर ते जुनागड रोड असा प्रवास केला. दुसऱ्या एसी कोचमध्ये अटेंडंट नव्हता. TTE ने २ रेल्वे कर्मचाऱ्यांना पकडून बेड रोल वाटले. तिसर्‍याने लिहिले की, ‘रेल्वेची वाईट स्थिती.’ चौथ्या युजरने लिहिले, ‘भारतीय रेल्वेला गंभीर आत्मपरीक्षणाची गरज आहे. गुणवत्ता नाही, कार्यक्षमता नाही, वेळेवर येण्याचा विचार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक अल्गोरिदम विकसित केला पाहिजे.