Viral video: वाघाला दूरून पाहिलं तरी भल्याभल्यांची भंभेरी उडते. विचार करा तोच वाघ अचानक समोर आला तर काय होईल? वाघ, सिंह, बिबट्या, जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्याशी वैर घ्यायला बाकीचे प्राणीही घाबरतात. त्यामुळे सहसा त्यांच्याशी पंगा घेण्याचं इतर प्राणी टाळतात. कारण हे धोकादायक प्राणी खूप शक्तिशाली असून क्रूर शिकारीही असतात. कधी कोणावर हल्ला करतील आणि फडशा पाडतील कोणीही सांगू शकत नाही. मात्र वाघासोबत भांडतानाचा कुत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओचा शेवट पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, साखळीला वाघाला बांधलेलं आहे तर कुत्रा हा मोकळाच आहे. सिंह शांत आहे तरीही कुत्रा त्याची वारंवार खोड काढत आहे. कुत्रा वाघावर जोरजोरात भूंकतही आहे. यावेळी वाघ त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतो. मात्र वारंवार कुत्रा त्रास देत असल्यानं वाघ आक्रमक होतो आणि कुत्र्यावर हल्ला करतो.‘वाघ हा सगळीकडे वाघच असतो, मग तो जंगलात असो किंवा साखळीत बांधलेला असो.” अशा प्रतिक्रिया नेटकरी व्हिडीओवर देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! लोकांच्या जीवाशी खेळ; तुम्हीही चवीनं नूडल्स खाता? VIDEO पाहून १०० वेळा कराल विचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.