रणथंभौर नॅशनल पार्कमधील वाघाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जंगलात फिरताना वाघाचे ठसे जरी दिसले, तरी अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. पण या नॅशनल पार्कमध्ये एक कुत्रा शांत झोपलेल्या वाघाजवळ गेला आणि भुंकू लागला. वाघाने क्षणाचाही विलंब न लावता कुत्र्याची मान पकडून शिकार केली. ही थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली असून आयआरएस अधिकारी अंकुर रॅप्रिया यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. एका पर्यटकाने नॅशनल पार्कमध्ये बसलेल्या वाघाचा हा व्हिडीओ वाईल्ड सफारी करताना काढला आहे.

वाघ शांतपणे आराम करत असताना अचानक एक कुत्रा त्याच्याजवळ येतो. वाघाला आपल्या शेजारी कुणीतरी आलं असल्याचा अंदाज येतो. त्यानंतर वाघाला जाग आल्यावर कुत्रा त्याच्यावर भुंकू लागतो. तितक्यात वाघ त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत कुत्र्याची शिकार करतो. हा व्हिडीओ शूट करत असताना चालकाला कार तातडीनं पाठीमागे घेण्यासाठी लोक सांगतात, असं या व्हिडीओत ऐकू येत आहे. वाघाने कुत्र्याची केलेली थरारक शिकार पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला असेल. वाघाच्या शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – Video: मैदानातच नव्हे, विमानातही सचिनची जोरदार बॅटिंग, चाहते म्हणाले, “सचिन…सचिन…”, तेंडुलकरनेही दिलं भन्नाट उत्तर

इथे पाहा व्हिडीओ

अंकुर रॅप्रिया यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून एक कॅप्शनही लिहिलं आहे. झोपलेल्या वाघाला आव्हान देऊ नका. हा इतका सोपा विषय नाहीय. रणथंभौरेचे T120 वाघ एकप्रकारे किलर मशिन आहेत. त्यांनी बिबट्यांच्याही शिकार केल्या आहेत. अस्वलासारखे प्राणीही वाघांनी खाल्ले आहेत.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून आतापर्यंत 140 k एव्हढे व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही अवाक झाले आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “वाघाच्या हद्दीत भटका कुत्रा फिरणं हे चांगलं दिसत नाही.” तर दुसऱ्या एकाने म्हटलं, कुत्र्याची बहादुरी समजू शकतो पण बहादुरपणा आणि मुर्खपणा यात मोठा फरक आहे.”