Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, असे अनेकदा सांगितले जाते; मात्र तरीही तरुणाई ऐकत नाही. मग साहजिकच कित्येकदा अशा व्यक्तींना प्रत्यही जीवालाही मुकावं लागतं.

असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. ज्यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा सोमवारी सकाळी गंगा नदीत बुडून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार चिमुकलीच्या आईसमोर घडला पण याची तिला भनकही नव्हती. बुडणाऱ्या मुलीकडे न पाहता आई रिल बनवण्यात व्यस्त होती. धक्कादायक बाब म्हणजे ही रिल मुलीची मावशीच बनवत होती आणि तिच्या कॅमेऱ्यात मुलीच्या बुडण्याचा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

वाराणसीतील चौबेपुर येथील उमराह गावातील संदीप पांडे यांची पत्नी अंकिता पांडे आपल्या एकुलत्या एका मुलीला तान्याला घेऊन छठ पूजेसाठी माहेरी सैदपुरमधील बोरवा गावात वडील कपिल मिश्रा यांच्या घरी गेली होती. सोमवारी छठ पूजेकरीता गंगा स्नानाला अंकिता, त्यांची पाच वर्षांची मुलगी, आई लक्ष्मी, बहिण आणि इतर परिवार गेला होता. इतर मुलांसोबत तान्या आंघोळ करत होती. तर मावशी आणि आजी गंगा नदीचा आनंद घेत होत्या. यावेळी अंकिता तान्याची आई या प्रकाराचा व्हिडीओ, रिल्स बनवत होती. यावेळी तान्या जेव्हा दिसेनाशी झाली तेव्हा कुटुंबीयांनी त्या परिसरात शोधाशोध केली.सुमारे दीड तासानंतर, तान्याचा मृतदेह सुमारे ५० मीटर खाली आढळून आला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Atullive01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी लोक स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात.