एरवी रेल्वे स्थानकावर अपघात होत असल्याच्या बातम्या येतात. यात प्रवाशाच्या घाईगडबडीमुळे अपघात होत असल्याचे दिसून येते. चालत्या ट्रेनमधून चढण्या उतरण्याच्या घटनांमुळे तर नागरिक जखमी देखील झाले आहेत. तरी देखील अनेक प्रवाशी हा प्रकार करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील इटावाह जिल्ह्यात घडली आहे.

इटावाह जिल्ह्यातील भरथाणा रेल्वे स्थानकावर एक प्रवासी चक्क रेल्वे ट्रॅक आणि फलाटामधील गॅपमध्ये पडला. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रवासी फलाट आणि ट्रॅकच्या मध्यभागी पडला. या व्यक्तीच्या अंगावरून रेल्वे गेली, मात्र सुदैवाने तो बचावला.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
kalyan death mystery marathi news, kalyan passenger marathi news
पुण्यातील रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा फटका टोळीचा गुंड अटकेत, प्रवाशाच्या हातावर मारला होता फटका

दृष्य धडकी भरवणारे

व्हिडिओमध्ये प्रवाशी या मानसाचे काय झाले हे पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहेत. वेगाने रेल्वे अंगावरून गेल्यानंतरही हा माणूस उठून उभा राहतो आणि सर्वांसमोर हात जोडतो. अंगावरून रेल्वे जाण्याचे हे दृष्य धडकी भरवणारे आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुबोध श्रीवास्तव या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. भोला सिंह असे या प्रवाशाचे नाव असल्याचे ते सांगतात.

ट्रेन अंगावरून गेल्यानंतरही प्रवाशी सुखरूप

ट्रेन अंगावरून गेल्यानंतर प्रवासी सुखरूप उभा होत आपले सामान ट्रॅकजवळून उचलतानाचे व्हिडिओत दिसते. या घटनेत प्रवासी जखमी झाल्याचे दिसून येत नाही. प्रवासी भारथाणा रेल्वे स्थानकावर आग्रा फोर्ट – लखनऊ जंक्शन इंटरसिटीमध्ये चढत असताना ही घटना घडल्याचे सुबोध यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

देशात रेल्वे स्थानकावरील अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत. नागरिकांनी रेल्वे संबंधी नियम पाळल्यास असे अपघात टाळता येऊ शकतात. वेळेत रेल्वे स्थानकावर पोहचने, चालत्या ट्रेनमध्ये चढणे उतरणे टाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते आणि नागरिकांचा जीवही वाचू शकतो.

(MP News: १५ महिन्यांच्या चिमुकल्यासाठी जखमी आईची वाघाशी झुंज! थेट त्याच्या जबड्यातून केली मुलाची सुटका)